मंगरूळपीर येथे सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी; २.१८ लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:19 IST2018-07-06T17:17:56+5:302018-07-06T17:19:50+5:30
मंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली.

मंगरूळपीर येथे सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी; २.१८ लाखांचे दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव विठ्ठल निंबेकर (रा.मंगरूळपीर) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ५ ते ६ जुलैच्या रात्रीदरम्यान त्यांच्या जय अंबे ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून ४ किलो ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत १ लाख ६० हजार २०० रुपये) तसेच ज्योतिबा ज्वेलर्स या दुकानातून १ किलो ४६५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २ लाख १८ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला.
अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक असदखाँ पठाण, राजेश खांडवे, हेड कॉन्स्टेबल माणिक चव्हाण, विनोद चित्तकवार, सत्यवादी खडसे, अरविंद सोनोने, उत्तम मेहल्डे, उमेश चचाने, रवि वानखडे करित आहेत.