रिव्हॉल्व्हरसह बॅगची चोरी, ट्रॅव्हल्समधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 22:32 IST2021-01-16T22:31:43+5:302021-01-16T22:32:07+5:30
बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत द्वारका हॉटेलजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्समधून दोन चोरांनी बॅग लंपास केली.

रिव्हॉल्व्हरसह बॅगची चोरी, ट्रॅव्हल्समधील घटना
बड़नेरा - बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत द्वारका हॉटेलजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्समधून दोन चोरांनी बॅग लंपास केली. त्यात लायसन्स असणारी रिव्हॉल्व्हर त्याची बुलेट व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. घटनेची तक्रार शनिवारी दाखल करण्यात आली.
रोशन राजेश्वर मेश्राम (५०) अलिबाग हे ट्रॅव्हल्समधून पनवेल येथून नागपूरसाठी प्रवास करीत असताना ट्रॅव्हल्स शनिवार, १६ जानेवारी रोजी अकोला महामार्गावरील द्वारका हॉटेलजवळ थांबली. फिर्यादी खाली उतरले. दरम्यान दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आसनावरील बॅग चोरून नेली. बॅगेत लायसन्स धारी रिव्हॉल्व्हर, सहा बुलेट इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. तक्रारीनंतर बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन चोरटे बॅग नेताना दिसून आले. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी दिली.