शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बावधनमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी ; धमकावून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:52 IST

फिर्यादी महिला या त्यांच्या राहत्या घरी एकट्याच होत्या...

पिंपरी : घरात एकटीच महिला असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात जाऊन महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील, कान, हात आणि पायातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅट क्रमांक ७, दुसरा मजला, दगडे पाटील व्हीला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक येथे घडली.   याप्रकरणी चंद्रभागा उत्तम दगडे (वय ४८, रा. दगडे पाटील व्हीला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २१) फिर्यादी चंद्रभागा या त्यांच्या राहत्या घरी एकट्याच होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून अज्ञात चोरटा चंद्रभागा यांच्या घरात शिरला. घरात जाताच या चोरट्याने चंद्रभागा यांचे तोंड दाबून आवाज केला तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यांच्या गळ्यातील, कान, हात आणि पायातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरtheftचोरी