दोस्त दोस्त ना रहा...! मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध; हत्येचं रचलं षडयंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 08:29 IST2023-06-24T08:29:01+5:302023-06-24T08:29:43+5:30

बिसंडा ठाण्यातील पल्हरी गावातील ही घटना असून याठिकाणी ३ मार्चला गावातील तलावाच्या किनारी एका युवकाचा मृतदेह सापडला होता.

The youth killed his friend due to immoral relationship with his wife at Uttar Pradesh | दोस्त दोस्त ना रहा...! मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध; हत्येचं रचलं षडयंत्र

दोस्त दोस्त ना रहा...! मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध; हत्येचं रचलं षडयंत्र

बांदा - उत्तर प्रदेशातील बांदा इथं प्रेम प्रकरणातून एका युवकाने त्याच्याच मित्राची हत्या केली आहे. हत्येच्या ४ महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले. मृत व्यक्तीच्या पत्नीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. ही गोष्ट पतीला माहिती होताच त्याने बऱ्याचदा पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने ऐकले नाही. ज्यामुळे घरात रोज वाद आणि भांडणे होत असत. पती पत्नीला मारहाणही करत असे. रोजच्या मारहाणीला वैतागून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचं प्लॅनिंग रचलं. 

पोलीस तपासात आरोपीने सांगितले की, माझे आणि मृतकाच्या पत्नीचे प्रेमसंबंध सुरू होते. परंतु ही गोष्ट त्याला समजल्यानंतर तो सातत्याने पत्नीला मारू लागला. त्यामुळे हत्येच्या हेतूने मी मित्राला तलावाच्या किनारी घेऊन गेलो. ज्याठिकाणी दोघांनी भरपूर दारू प्यायली. जेव्हा मित्र नशेत धुंद झाला तेव्हा चाकूने मित्राचा गळा चिरला आणि घटनास्थळावरून फरार झालो. 

बिसंडा ठाण्यातील पल्हरी गावातील ही घटना असून याठिकाणी ३ मार्चला गावातील तलावाच्या किनारी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. युवकाची हत्या धारदार शस्त्राने झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवून दिला. या घटनेचा तपास सुरू होता. त्यानंतर अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनुसार, देवेंद्र कैरी गावातील रहिवासी होता. लहानपणापासून तो पल्हरी गावात राहायचा. देवेंद्रची पत्नी कल्पनाही तिथे राहत होती. देवेंद्रच्या बाजूला राहणारा रवि कुशवाहा हा त्याचा खास मित्र होता. त्यामुळे त्याचे घरी येणे जाणे होते. त्याचवेळी रविचे मृत देवेंद्रच्या पत्नीसोबत सूत जुळले. ज्याची माहिती देवेंद्रला लागली. त्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा आणि मित्राशीही बोलणे बंद केले. 

मित्रानेच केली मित्राची हत्या
या प्रकरणानंतर दोन्ही मित्रांमध्ये वाद झाले. त्यानंतर पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. ३ मार्चला रात्री रवि आणि देवेंद्र गावाशेजारील तलावाजवळ दारू प्यायला गेले. त्याठिकाणी रविने चाकूने देवेंद्रचा गळा चिरला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results


 

Web Title: The youth killed his friend due to immoral relationship with his wife at Uttar Pradesh