"दारू सोडून कामधंदा कर", असा सल्ला देताच लहान भावाचा मोठ्या भावावर चाकूनं हल्ला

By सदानंद नाईक | Updated: July 27, 2024 18:36 IST2024-07-27T18:35:26+5:302024-07-27T18:36:12+5:30

या सल्ल्याचा राग येऊन गौतम याने सिद्धार्थ याच्या पोटात चाकूने वार करून जखमी केले.

The younger brother attacked the elder brother with a knife as soon as he advised him to "give up alcohol and do work". | "दारू सोडून कामधंदा कर", असा सल्ला देताच लहान भावाचा मोठ्या भावावर चाकूनं हल्ला

"दारू सोडून कामधंदा कर", असा सल्ला देताच लहान भावाचा मोठ्या भावावर चाकूनं हल्ला

उल्हासनगर : दारू सोडून कामधंदा कर, या सल्याचा राग येऊन लहान भावाने मोठ्या भावाच्या पोटावर चाकूने सोमवारी सायंकाळी वार केले. या हल्ल्यात सिद्धार्थ वानखडे याची किडनी निकामी झाली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गौतम वानखडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-४, कृष्णा मॅरेज हॉल समोर २३ जुलै सोमवारी सायंकाळी ५ वाजता सिद्धार्थ गणेश वानखडे हा मित्रा सोबत गप्पा मारीत होता. त्यावेळी लहान भाऊ गौतम गणेश वानखडे तेथे आला. तेव्हा सिद्धार्थ याने गौतमला मोठ्या भावाच्या नात्याने दारू पिऊन भांडण करू नको. दारू सोडून कामधंदा कर, असा सल्ला दिला. 

या सल्ल्याचा राग येऊन गौतम याने सिद्धार्थ याच्या पोटात चाकूने वार करून जखमी केले. तसेच चाकू दाखवीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. जखमी सिद्धार्थ याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून चाकू हल्ल्यात त्याची किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिद्धार्थ वानखडे यांच्या तक्रारींवर विठ्ठलवाडी पोलिसांनी गौतम वानखडे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११०(२), ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The younger brother attacked the elder brother with a knife as soon as he advised him to "give up alcohol and do work".