शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'मी बलात्कार केला नाही' अशी सुसाईड नोट लिहून युवा खेळाडूने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:42 IST

Athlete commited suicide by write suicide note : पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका नवोदित खेळाडूच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. भैसीमध्ये रायपूर नागली गावात राहणाऱ्या २३ वर्षीय राहुलने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली काढला असता त्याच्या खिशातून सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

राहुल हा एक युवा खेळाडू होता, ज्याने आपल्या तरुण वयात देश-विदेशात अनेक पदके जिंकली होती. दिल्लीत राहून तो ऑलिम्पिकची तयारी करत होता. यादरम्यान दिल्लीतील एका मुलीच्या नातेवाईकांनी राहुलविरुद्ध मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुलला त्याच्या गावातून अटक केली होती. सुमारे 19 महिने तो तुरुंगात होता आणि महिन्याभरापूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तेव्हापासून तो नैराश्यात होता.सुसाईड नोटमध्ये वेदना व्यक्त केल्या आहेतसुसाईड नोटमध्ये राहुलने लिहिले की, 'माझे जीवन व्यर्थ झाले आहे. मला खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात पाठवल्यापासून मी नैराश्यात आहे. मी काही चुकीचे केले नाही. ती मुलगी फक्त माझी मैत्रीण होती. तिने मला नोकरीसाठी बोलावले. तरीही मुलीच्या आई-वडिलांनी मला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले. १९ महिने तुरुंगात राहिल्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आता मला सरकारी नोकरीही मिळणार नाही. तुरुंगात गेल्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे. मला माफ कर! यात माझ्या कुटुंबाचा दोष नाही. मी जे काही करत आहे, ते माझ्या स्वेच्छेने करत आहे. मात्र, मुलीच्या पालकांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांनी मला पैशासाठी खोटे ठरवले. बाबा मला माफ करा. माझं स्वप्न मोठं ऍथलीट होण्याचं होतं. मी पण खूप मेहनत घेतली. देश-विदेशात अनेक पदके जिंकली, पण माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी बलात्कार केला नाही. या मुलीनेही मला काहीही झाले नसल्याचे म्हटले आहे. तरीही मला शिक्षा झाली. मी या कलंकासह जगू शकत नाही. प्रत्येकजण माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहे. मी कोणाशीही बोलू शकलो नाही. म्हणूनच मी माझे जीवन संपवत आहे. माफ करा, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो.राहुलचे वडील मुकेश कुमार यांनी सांगितले की, तो खूप डिप्रेशनमधून जात होता. मुलीचे आई-वडील तिला पैशासाठी ब्लॅकमेल करत होते. महिनाभरापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. दिल्लीत राहून तो ऑलिम्पिकची तयारी करत होता. मुलीच्या पालकांनी एफआयआर करून घेतला होता. सुसाईड नोटमध्ये मुलीच्या पालकांनी तिच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. ते पैशाची मागणी करत होते. यापूर्वीही आम्ही दहा लाख दिले होते. या संदर्भात आम्ही खतौली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी मुझफ्फरनगरचे एसपी सिटी अर्पित विजयवर्गीय सांगतात की, सोमवारी एका तरुणाने खतौली पोलीस स्टेशन परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह झाडावरून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मृत व्यक्तीने कोणाचा उल्लेख केला आहे याचा तपास करत आहोत. चौकशीच्या आधारे कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू