नालंदा - प्रेम लपून लपून राहत नाही असं म्हणतात. बिहारमधील नालंदा येथे एका तरुणाला आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप यावे लागले. ही घटना दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर गावातील आहे. सोमवारी दुपारी एक तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी आला. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला पकडले. नंतर गावातील मंदिरात प्रेमीयुगुलांचे लग्न लावून दिले.मिळालेल्या माहितीनुसार, सिलाओ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडाडीह येथील अमरजीत कुमारचे दीपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीरामनगर येथील एका तरुणीसोबत चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघे अनेकदा गुपचूप एकमेकांना भेटायचे. सोमवारी दुपारी अमरजीत हा प्रेयसीच्या घरी नातेवाईकांच्या अनुपस्थितीत तिला भेटण्यासाठी आला होता. मात्र घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही पकडले. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं.यानंतर नातेवाईकांनी बाजारातून लग्नाचे कपडे आणले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने गावातीलच मंदिरात प्रेमीयुगुलांचा विवाह झाला. बँड-बाजा, वरातीशिवाय मंदिरात झालेल्या या लग्नामुळे गावात विविध चर्चा सुरू आहेत. सध्या हे प्रेमळ जोडपं लग्नाच्या बंधनात अडकल्याचा आनंद दिसत आहे. लग्नानंतर प्रियकर अमरजीत त्याच्या पत्नी झालेल्या प्रेयसीला मोटारसायकलवर घेऊन घराकडे निघाला.
प्रेयसीला गुपचूप भेटायला आलेल्या तरुणाला घरच्यांनी पकडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 21:59 IST