सामूहिक बलात्कारानंतर व्हिडिओ केला व्हायरल, दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 07:33 IST2022-08-15T07:32:56+5:302022-08-15T07:33:18+5:30

crime news : काही गावगुंडांनी मुलीला पकडून शेतात नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

The video went viral after the gang rape in bihar | सामूहिक बलात्कारानंतर व्हिडिओ केला व्हायरल, दोन जणांना अटक

सामूहिक बलात्कारानंतर व्हिडिओ केला व्हायरल, दोन जणांना अटक

पाटणा : बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यातील गोविंदपूर गावात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दोन जणांना अटक केली. 
काही गावगुंडांनी मुलीला पकडून शेतात नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हिडिओतून पीडित मुलगी कोण हे स्पष्ट होत नाही. तथापि, या व्हिडिओच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक दीपक रंजन यांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओत पोचूसिंह लूंगी घालून उभा असल्याचे तर तरुणी जिन्स पँट घालताना दिसते. यादरम्यान कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे. कपडे घातल्यानंतर पीडित तरुणी व्हिडिओ बनविणाऱ्या तरुणाला गयावया करताना दिसते. पोलिसांकडे आतापर्यंत कोणीही तक्रार दिलेली नाही. 

हा व्हिडिओ ३ ते ४ महिने जुना आहे. मात्र तरीही पोलिसांनी स्वत:हून घटनेची दखल घेत व्हिडिओच्या माध्यमातून दोघांना ताब्यात घेतले असून, यात गोविंदपूर येथील रहिवासी रामाधार शर्मा उर्फ पोच व अन्य एकाचा समावेश आहे. 

Web Title: The video went viral after the gang rape in bihar