नागौर - राजस्थानच्या नागौर पोलिसांना आव्हान देणाऱ्या कमला चौधरीला अटक करण्यात आली आहे. स्वत:ला लेडी डॉन म्हणवणाऱ्या कमलाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे नागौर एसपीसह काही नेत्यांना खुले आव्हान दिले. तिने शस्त्रासह व्हिडिओ अपलोड केला, त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिच्यावर शस्त्रास्त्र आणि आयटी कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागौरमध्ये तिचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. ती तिच्या स्कूटीवरून कुठेतरी जात होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी तिला जोधपूर रोडवरून अटक केली. सध्या जयल पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे.काही दिवसांपूर्वी कमला चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे एसपींना चॅलेंज केले होते की, ती ड्रग्स घेते. जमलं तर थांबवा. तसेच, तिने शस्त्रासह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. याआधीही तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पण त्याचा कमलावर काहीही फरक पडला नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमला ही बुधवारी रात्री शहरातील रस्त्यांवर बिनधास्त फिरत होती. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तिच्यावर मोठी कारवाई केली.
ओपन चॅलेंज दिले लेडी डॉनने एसपीला, बिनधास्त फिरत होती; २४ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 22:37 IST