शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जेवणात केस निघाल्यानं पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला अन् सगळ्यांसमोरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 09:29 IST

यासंदर्भात पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती जेवण करत असताना जेवणात केस निघाला. या मुळे तो प्रचंड भडकला. त्याने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्याने तिचे हात-पाय बांधून...

जेवणात केस निघाला म्हणून पती रागाच्या भरात अक्षरशः राक्षस बनला आणि त्याने त्याच्या पत्नीसोबत एवढे घाणेरडे कृत्य केले, की जे वाचून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील. याहूनही राक्षसीपणाचा कळस म्हणजे, या घाणेरड्या कृत्यात त्याच्या कुटुंबातील लोकही त्याला मदत करत होते. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील आहे. याप्रकरणी संबंधित 30 वर्षीय महिलेने आपल्या पतीसह तीन लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती जेवण करत असताना जेवणात केस निघाला. या मुळे तो प्रचंड भडकला. त्याने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्याने तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न केला. पण तिने त्याला विरोध केला. यामुळे त्याने तिच्या डोक्याचे केस कापत तिचे टक्कल केले.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा संपूर्ण प्रकरा सुरू असताना, पीडित महिलेची सासू आणि दीर तेथेच उभे राहून हा संपूर्ण प्रकार बघत होते आणि तिच्या पतीला प्रोत्साहन देत होते, असा आरोपही पीडितेने केला आहे. एवढेच नाही, तर हा संपूर्ण प्रकार पीडितेने तिच्या माहेरच्यांना फोन करून सांगितला. ते  तिच्या घरी पोहोचले. मात्र, ते घरी पोहोचताच तिच्या पतीने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असेही संबंधित पीडित महिलेने म्हटले आहे.

याशिवाय, पीडितेचा पती हुंड्याची मागणी करत तिला मारहाणही करतो आणि मुलाला सोडून घरातून निघून जा असेही म्हणतो, असा आरोपही संबंधित महिलेने केला आहे.  महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटकही करण्यात आली आहे. तसेच संबंधित पीडिता आपल्या माहेरी गेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेशMolestationविनयभंगPoliceपोलिस