शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

प्रियकराने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटविले; ६१टक्के भाजल्याने रुग्णालयात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:57 IST

Self Immolation Case : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोळा वर्षीय मुलाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले; मात्र काही कारणावरून प्रेयसीसोबत त्याचे वाद झाले आणि या वादातूनच मुलाने मागचापुढचा काहीही विचार न करता संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.

नाशिक : प्रेमाला काही नातं नसतं प्रेम कधीही आणि कुणावरही जडते. प्रेमाला वयाचेही भान नसते. प्रेमातून रेशीम गाठी बांधण्याच्या आणाभाका घेतल्या जातात त्यात काही यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात; मात्र प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यापोटी काहीतरी टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविणे हे योग्य नाहीच; मात्र दुर्दैवाने अशीच घटना पंचवटीतील हिरावाडी भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सोळाव्या वर्षी अल्पवयीन मुलाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याने त्याचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोळा वर्षीय मुलाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले; मात्र काही कारणावरून प्रेयसीसोबत त्याचे वाद झाले आणि या वादातूनच मुलाने मागचापुढचा काहीही विचार न करता संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी (दि.२४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हिरावाडीमधील एका मंदिरामागेे घडली. येथील पुलावर अजय मोहन धोत्रे याने बाटलीत पेट्रोल आणून स्वत:च्या अंगावर टाकून पेटवून घेतले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने दाखल केले. तो ६१टक्के भाजला होता.

आठवडाभर त्याची मृत्युशी झुंज सुरु होती; मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी (दि.३) त्याचा मृत्यु झाला. हिरावाडी परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील दोघे भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNashikनाशिक