शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंध पसरल्यानं घटना उघडकीस, बेपत्ता झालेल्या वृद्धाचा लिफ्टखाली अडकून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:22 IST

Deadbody Fount under Lift : अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.

ठाणे : चंदनवाडी परिसरात लिफ्टच्याखाली अडकून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हा इसम दोन दिवसांपासून बेपत्ता होता. शुक्रवारी सायंकाळी वास येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.चंदनवाडी परिसरात सातच्या  जाई अ-८ही इमारत आहे. या इमारतीच्या लिफ्टच्या खाली अडकून नारायण बेलोसे(७०) यांचा मृत्यू झाला. नारायण बेलोसे हे याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मुलासोबत राहत होते. बुधवारी रात्री ते राहत असलेल्या परिसरात एक कार्यक्रम होता. त्यात सहभागी झाल्यानंतर ते बेपत्ता होते. गुरुवारी सकाळपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने नौपाडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी दुर्गंध येऊ लागल्यानंतर इमारतीच्या रहीवाश्यांनी नौपाडा पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर नौपाडा पोलीस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी ठाणेअग्निशमन दलाचे जवान तिथे दाखल झाले.  लिफ्टच्या खाली नारायण बेलोसे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी यांच्या मदतीने बेलोसे यांचा मृतदेह लिफ्ट रूममधून बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

  

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणेPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलMissingबेपत्ता होणं