घरात एकटी पाहताच पीडित मुलीला घट्ट पकडून चुंबन घेतले; आरोपीला तीन वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 14:06 IST2023-05-24T14:06:10+5:302023-05-24T14:06:39+5:30
मनोज रघुनाथ गोडाले असे या प्रकरणातील शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो देवळी तालुक्यातील रहिवासी आहे.

घरात एकटी पाहताच पीडित मुलीला घट्ट पकडून चुंबन घेतले; आरोपीला तीन वर्षांचा कारावास
बारावीचे शिक्षण घेणारी मुलगी घरी एकटी असल्याचे हेरून तिला घट्ट पकडत थेट चुंबन करणाऱ्यास दंडासह तीन वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश- १ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिला. मनोज रघुनाथ गोडाले असे या प्रकरणातील शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो देवळी तालुक्यातील रहिवासी आहे.
मामाच्या घरी राहून पीडिता घेत होती बारावीचे शिक्षण
घटनेच्या वेळी पीडिता ही मामाच्या घरी राहून बारावीचे शिक्षण घेत होती. १२ सप्टेंबर २०१८ ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पीडितेचे आजी- आजोबा पोथी ऐकण्यासाठी तर मामा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. अशातच पीडिता ही घरी एकटी असल्याचे हेतूने मनोज याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घरात एकटी असलेल्या पीडितेला घट्ट पकडून तिच्या गालाचे चुंबन घेत तिचा विनयभंग केला.
स्वतःला सावरत मामाला सांगितली आपबिती
घरी एकटी असलेल्या पीडितेने मोठा धाडस करीत जोराचा धक्का देत आरोपीला घराबाहेर काढून घराचे दार बंद केले. थोड्या वेळानंतर पीडितेचा मामा घरी आल्यावर पीडितेने स्वतःला सावरत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मामाला दिली. संबंधित प्रकार गंभीर असल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी पुलगाव पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.
चार साक्षीदारांची तपासली साक्ष
संबंधित प्रकरणी तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास पुलगाव पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनि- रीक्षक चेतन मराठे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.