शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंडची मदत महिलेला पडली महागात, ८ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 09:32 IST

आठ लाखांना घातला गंडा, चार जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे फेसबुकवरील मित्राला सांगणे अलका पाटील (५२) या महिलेस ‘महाग’ पडले. मदतीच्या बहाण्याने त्या कथित मित्राने अलका यांना आठ लाखांना गंडा घातला. शुक्रवारी नवघर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. 

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्टमध्ये राहणाऱ्या अलका या गृहिणीचे पती चंद्रकांत हे गेल्यावर्षी अभिनय विद्या मंदिरमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. पतीच्या निवृत्तिवेतनावर घर चालत असल्याने मुलांच्या शिक्षणाकरिता जास्त पैसे खर्च होत असल्याने आर्थिक अडचण अलका यांनी त्यांचे फेसबुकवरील अनोळखी मित्र डॉ. रायन रोलांड नावाच्या व्यक्तीस सांगितली. त्या अनोळखी मित्राने आर्थिक मदतीकरिता अलका यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली. त्याने बँक ऑफ लंडनमधून अलका यांच्या खात्यात ८० हजार पौंड ट्रान्सफर झाल्याचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला. मात्र, नंतर अलका यांना फोन करून परदेशातून पैसे पाठवले असल्याने प्रोसेसिंग शुल्क म्हणून पैसे भरावे लागतील असे सांगून अलका यांच्याकडून ऑनलाइन तब्बल आठ लाख नऊ हजार रुपये उकळले.

८० हजार पौंडाचा मोह  ८० हजार पौंड मिळणार म्हणून अलका यांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम, तसेच त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्या अनोळखी व्यक्तीच्या विविध खात्यात पैसे भरले.   नंतर तुम्ही परदेशातून बेकायदा पैसे ट्रान्सफर करत असल्याने पोलिसांना माहिती देऊ अन्यथा साडेसहा लाख रुपये द्या, असे अलका यांना धमकावण्यात आले.   आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर शुक्रवारी अलका यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी डॉ. रायनसह मिसेस निर्मला श्रीवास्तव व आणखी दोघा मोबाइल क्रमांकधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी समाज माध्यमांवर आपली माहिती देऊ नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस