क्रूरतेचा कळस! लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दाेन वेळा अत्याचार
By राजकुमार जोंधळे | Updated: August 31, 2023 08:07 IST2023-08-31T08:06:52+5:302023-08-31T08:07:47+5:30
लातूर जिल्ह्यात नांदुर्गा येथील घटना, किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

क्रूरतेचा कळस! लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दाेन वेळा अत्याचार
राजकुमार जाेंधळे, किल्लारी (जि. लातूर): अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे घडली. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, नांदुर्गा येथील एका दहा वर्षीय मुलगी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिकवणीला जाताना मुकेश अंबाजी बनसाेडे (वय ३३) याने अत्याचार केले. पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतनजीक असलेल्या रिकाम्या गाेदामात अत्याचार केला. याबाबत काेणाला सांगितले तर खल्लास करताे, अशी धमकी दिली.
याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कलम ३७६ (२) (एन) भादंवि, ४, ६, ८, १२ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक अशोक ढोणे करत आहेत.