शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"मुलगी तर मेलीये, आता मुलगाही मरणार", नीट विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळाली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:24 IST

NEET Girl Student Death: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहामध्ये मिळाला होता. तिच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू असतानाच तिच्या कुटुंबीयांना एक धमकीची चिठ्ठी मिळाली. 

वसतिगृहात राहून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे प्रकरण इतके वाढले की, हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देण्यात आले. त्याचवेळी आता मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. कुटुंबीयांना एक चिठ्ठी मिळाली. मुलगी तर मेली आहे, तुमचा मुलगाही मरणार, असे या चिठ्ठीत लिहिलेले आहे. 

मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. धमकीची चिठ्ठी वाचून कुटुंबीय हादरले आहेत. अज्ञात व्यक्तीने चिठ्ठी थेट त्यांच्या घरात फेकली. "सांगितलेलं ऐकणार नसाल, तर दोन दिवसात मुलगाही मरेल", असे या चिठ्ठीत म्हटलेलं आहे. 

यापूर्वी शनिवारी स्वयंपाक घराच्या खिडकीमध्ये एक चिठ्ठी मिळाली होती. त्यातही अशी धमकी दिली होती की, "जास्त हुशारी कराल, तर उचलू आणि मारून टाकू." धमकीच्या दोन चिठ्ठ्या मिळाल्यानंतर मयत विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाकडे सुरक्षेबद्दल व्यथा मांडली. 

मयत मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, यापूर्वी दिलेली धमकी ही तपास करणाऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिली गेली होती. आता आम्हालाच दिली गेली आहे. 

सीबीआयने चार तास केली चौकशी

या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी दुपारी ३ वाजता गावात पोहोचले. अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्वतंत्रपणे चौकशी केली. जवळपास साडेचार तास चौकशी सुरू होती. 

भावाचा मोबाईल सीबीआयने केला जप्त 

अधिकाऱ्यांनी मुलीच्या भावाचा मोबाईळ ताब्यात घेतला आहे. सीबीआय या मोबाईलची तपासणी करणार आहे. त्यातील कॉलची माहिती, मेसेज, सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट, कमेंट्स आणि इतर गोष्टींची माहिती मिळवणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : NEET aspirant's family threatened after her suspicious death; CBI investigates.

Web Summary : After a NEET student's suspicious death, her family received threatening notes. The CBI is investigating, questioning family members and seizing the brother's mobile phone. The family fears for their son's life after receiving threats.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीDeathमृत्यूCBIसीबीआयBiharबिहार