संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:34 IST2025-08-04T10:33:53+5:302025-08-04T10:34:08+5:30

पत्नी आपला विश्वासघात करत असल्याचा संशय या सीआरपीएफ जवानाला होता. या संशयाच्या भूतामुळे त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला.

The ghost of suspicion sat on the neck, a CRPF jawan beheaded his wife! He went to the news channel's office and... | संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना तामिळनाडूमधून समोर आली आहे. तमिळनाडूतील तुतीकोरिन येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या एका कॉन्स्टेबलला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली. या जवानाने  प्रथम आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आपल् पत्नीचा जीवच घेतला नाही तर, तिचे शीर धडापासून वेगळे केले. 

पत्नी आपला विश्वासघात करत असल्याचा संशय या सीआरपीएफ जवानाला होता. या संशयाच्या भूतामुळे त्याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि तिचे शीर धडापासून वेगळे केले.

स्वतः गेला अन् कबुली दिली!

पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपीने स्वतः एका वृत्तवाहिनीवर जाऊन आपला गुन्हा कबूल केला आणि आपल्या कृत्याचा पाढा वाचला. सगळ्यांसमोर जाऊन तो म्हणाला की, "मी सर्वांना सांगू इच्छितो. मी माझ्या पत्नीची हत्या केली." यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

तुतीकोरिनच्या थलवैपुरम गावातून हे प्रकरण समोर आले आहे. येथे राहणारा तमिळ सेल्वन हा सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे उमा माहेश्वरी नावाच्या महिलेशी लग्न झाले. या जोडप्याला २ मुले आहेत.

सेल्वनने आधी खून केला आणि पळून गेला
सेल्वनला काही दिवसांपासून त्याच्या पत्नीवर संशय होता. तमिळ सेल्वनला संशय होता की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. यामुळे ३१ जुलै रोजी त्याचे घरी पत्नी उमा माहेश्वरीशी कडाक्याचे भांडण झाले आणि या भांडणात सेल्वनने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि तिचा शिरच्छेद केला. यानंतर, तो त्याच्या ९ वर्षांच्या मुलाला आणि ७ वर्षांच्या मुलीला घेऊन त्याच्या मामाच्या घरी गेला. मुलांना आपल्या मामाच्या घरी सोडून सेल्वनने तेथून पळ काढला होता.

चॅनेलवर गेला आणि सगळं सांगितलं!
पत्नीची हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी, सेल्वन एका वृत्तवाहिनीवर गेला. त्याने चॅनेलला त्याच्या पत्नीच्या हत्येबद्दल सर्वांना सांगण्यास सांगितले. सेल्वनचे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसला. त्यांनी ताबडतोब थेनमपेटचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरोकिया रवींद्र यांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सेल्वनला अटक केली. तुतीकोरिनचे एसपी अल्बर्ट जॉन म्हणाले की, तमिळ सेल्वन काही काळापासून त्याच्या पत्नीवर संशय घेत होता आणि या संशयामुळे त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली.

Web Title: The ghost of suspicion sat on the neck, a CRPF jawan beheaded his wife! He went to the news channel's office and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.