गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:59 IST2022-02-21T19:56:20+5:302022-02-21T19:59:11+5:30
Drugs Case : गुप्तांगामध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, त्या काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल
जयपूर : सांगानेर विमानतळावर पकडलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिलेच्या शरीरातून ड्रग्जने भरलेल्या कॅप्सूल काढण्याचे काम एसएमएस हॉस्पिटलमध्ये सुरूच आहे. गुप्तांगामध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, त्या काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व कॅप्सूल बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते उघडण्यात येणार असून त्यानंतर त्यामध्ये कोणते ड्रग्ज लपवून ठेवले आहेत, याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणी न्यायालयासमोरही अहवाल सादर करावा लागणार आहे. महिला रुग्णालयात असल्याने अद्याप तिची चौकशी झालेली नाही. संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डीआरआयचे अधिकारी त्यांची चौकशी सुरू करतील, असे मानले जात आहे.
याआधीही राजधानी जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका व्यक्तीला पकडले होते. त्याच्या तोंडात एअर इंटेलिजन्स विंगच्या अधिकाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आरोपींनी 116.590 ग्रॅम सोने जिभेखाली लपवले होते. त्याची किंमत 5 लाख 79 हजार 452 रुपये होती.