"भेळ चांगली झाली नाही, तुम्ही येथे गाडी कशी लावता पाहतो"; दोघांना मारहाण करत गाडीचाही केला चक्काचूर

By रूपेश हेळवे | Updated: December 27, 2022 16:44 IST2022-12-27T16:44:11+5:302022-12-27T16:44:56+5:30

याबाबत विजय किशोर जाटव ( वय ४०, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

The car was smashed due to not feeding the mixture properly | "भेळ चांगली झाली नाही, तुम्ही येथे गाडी कशी लावता पाहतो"; दोघांना मारहाण करत गाडीचाही केला चक्काचूर

"भेळ चांगली झाली नाही, तुम्ही येथे गाडी कशी लावता पाहतो"; दोघांना मारहाण करत गाडीचाही केला चक्काचूर

रूपेश हेळवे -

सोलापूर: भेळ चांगली झाली नाही, तुम्ही येथे गाडी कशी लावता पाहतो असे म्हणत दोघांना मारहाण करत गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विजय किशोर जाटव ( वय ४०, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी जाटव यांचे भेळचा हातगाड असून ते आपल्या पुतण्या सोबत राजेश पायलट चौक, जुना विडी घरकुल येथे आपल्या हातगाडीवर व्यावसाय करतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी आकाश कुंभार व त्याचे पाच ते सहा साथीदार भेळ खाण्यासाठी आले. तेव्हा भेळ चांगली झाली नाही म्हणत कुंभार याने फिर्यादीच्या पुतण्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर सर्वांनी तुमची भेळ विक्रीचा हातगाडा येथे कसे लावता हेच आम्ही बघतो म्हणत दमदाटी करत, हातगाडा ढकलून खाली पाडल्याने गाडीचे काच फुटून नुकसान झाले. याबाबत जाटव यांच्या यांच्या फिर्यादीवरून कुंभार व पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास चव्हाण करत आहेत
 

Web Title: The car was smashed due to not feeding the mixture properly