शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

लॉजमध्ये प्रेयसीला नेऊन प्रियकराने गळा दाबून केली हत्या, प्रियकर फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 5:51 PM

Murder Case : वसईतील एका लॉजमधील धक्कादायक घटना

नालासोपारा : वसईच्या पापडी येथील एका लॉजमध्ये २६ वर्षीय प्रेयसीची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्या झाल्यानंतर आरोपी प्रियकर फरार झाला आहे. वसई पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा तपास करत आहे.वसईच्या पापडी परिसरात मुख्य रस्त्यावर स्टेटस लॉज आहे. या ठिकाणी एक जोडपे रविवारी दुपारच्या वेळी मुक्कामासाठी आले होते. रविवारी रात्री जेवणासाठी व सोमवारी सकाळी नाश्त्यासाठी लॉजच्या खोलीतून एकही कॉल नव्हता. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चेक आऊट करण्याची वेळ आली, तरी कोणताही प्रतिसाद हॉटेल व्यवस्थापकाला मिळाला नाही. शेवटी हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्या खोलीच्या दरवाजातील घंटी वाजवली तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. कर्मचाऱ्याने ही माहिती हॉटेल व्यवस्थापकांना सांगितली. त्यांना यात काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर ही माहिती वसई पोलिसांना दिली.

पोलीस हॉटेलच्या ठिकाणी आल्यावर दार उघडण्यात आले. तर रूमच्या पलंगावर प्रेयसीचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार करून तिचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच आरोपी हा रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघून गेल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे ही हत्या रविवारी दुपारी झाल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. हे जोडपे मागील सात वर्षांपासून हॉटेलमध्ये येत असल्याने ओळखीचे होते, तसेच या दोघांचे लग्न जमले असून, लवकरच ते विवाहबंधनात अडकले जाणार होते, अशी माहिती हॉटेलचे मालक प्रकाश हेगडे यांनी दिली. ही हत्या आरोपी प्रियकराने का व कोणत्या कारणावरून केली, याचा पोलीस तपास करीत आहेत.

 

 

प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीने रविवारी दुपारी हत्या करून त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. आरोपी तरुणाची ओळख पटली असून, लवकरच त्याला अटक केली जाईल. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे.

टॅग्स :Deathमृत्यूVasai Virarवसई विरारPoliceपोलिस