शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
2
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
3
निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
इंजिनिअर जावई शोधला, लग्नात ६० लाखांचा खर्च; हुंड्यासाठी छळ, लेकीने ६ महिन्यांत आयुष्य संपवलं
6
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
7
'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
8
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
9
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
10
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
11
मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
12
राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
13
बाबा वेंगाचे भाकित: २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखी, प्रलयाने हादरणार जग; पृथ्वीचा एक भाग होणार बेचिराख
14
'माझ्यामुळेच जिंकलो असं कुणी समजू नये', अमित शाहांनी भाजप नेत्यांचे टोचले कान
15
'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
16
'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
17
Video - 'आयफोन' वाला लंच बॉक्स घेऊन शाळेत गेला मुलगा; शिक्षिकाही झाली हैराण
18
अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी
19
ज्यांचे बँक खाते किंवा UPI ID नाही त्यांनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार! भीम ॲपचे नवीन फीचर' लाँच
20
गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासूनचे ‘संबंध’ आणि एका रात्रीत खून; बॅगेत भरला तरुणीचा मृतदेह, २४ तासांत आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:43 IST

देसाई गावाकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीमध्ये पुलाखाली  एका बॅगेमध्ये २४ नाेव्हेंबर राेजी दुपारी ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती  डायघर पाेलिसांना मिळाली

जितेंद्र कालेकर ठाणे - बॅगेत भरलेला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह देसाई खाडीत मिळाला.  सीसीटीव्हीतील फुटेज आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे यातील आराेपी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०, रा. देसाईगाव, ठाणे, मूळगाव-गोरखपूर,  उत्तरप्रदेश ) याला २४ तासांत अटक करण्यात डायघर पाेलिसांना यश आले. पाच वर्षांपासून तिच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  राहत असताना एका रात्रीत तिच्याकडून शरीरसंबंधासाठी आलेल्या नकारामुळे संतापलेल्या विनोदने हा खून केल्याची माहिती तपासात उघड झाली.

देसाई गावाकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीमध्ये पुलाखाली  एका बॅगेमध्ये २४ नाेव्हेंबर राेजी दुपारी ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती  डायघर पाेलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक  श्रीराम पाेळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.  तेव्हा खाडीच्या पाण्यातील भरावावर पडलेल्या बॅगेत गुडघ्यात पाय दुमडून भरलेला अर्धवट मृतदेह बाहेर आल्याचे आढळले. तिच्या हाताच्या मनगटाजवळ पीव्हीएस हे इंग्रजीत गाेंदलेले आद्याक्षर  हाेते. कुजलेल्या अवस्थेतील या मृतदेहाची ओळख पटविण्यास काेणीही पुढे आला नाही.  साेशल मीडियावरही माहिती प्रसारित केली; तर दुसरीकडे सहायक निरीक्षक संताेष चव्हाण, अनिल रजपूत आणि याेगेश लामखेडे या पथकाने सीसीटीव्ही पडताळणी  केली. एकाने ही बॅग खाडी पुलावरून  फेकल्याची माहिती खासगी प्रवासी कारचालकाने दिली. त्याच आधारे सीसीटीव्ही पडताळून विनाेद विश्वकर्मा या गवंडीकाम करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले.

नेमके काय घडले?गेल्या पाच वर्षांपासून प्रमिला (२२, नावात बदल) हिच्यासोबत विनोद लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देसाई गावात राहत हाेता. २१ नाेव्हेंबर राेजी रात्री तिच्याशी शरीरसंबंध ठेवताना पाेटात दुखत असल्याच्या कारणावरून तिने ओरडून त्याला प्रतिकार केला. याच कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या विनाेदने तिचा गळा आवळून खून केला. एक दिवस मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी सुटल्यानंतर विनोदने मृतदेह बॅगेत भरून खाडीत फेकला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Live-in Partner Killed After Sex Refusal, Body in Bag, Arrested

Web Summary : A 25-year-old woman's body was found in a bag. Her live-in partner, Vinod Vishwakarma, was arrested for murder after she refused him sex. He strangled her and dumped her body in a creek.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी