शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Udaipur killing: २६११ नंबर असलेली बाईक कन्हैयाच्या मारेकऱ्याने 5000 खर्चून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:49 IST

Udaipur killing: योगायोगाने हा एकदा मुंबईवर झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तारखेशी मिळता जुळता आहे.

उदयपूरमधील टेलर कन्हैया लालच्या भीषण हत्येच्या तपासावर एनआयएची टीम कंबर कसत आहे. या घटनेशी संबंधित प्रत्येक कान्याकोपऱ्यातून तपास करण्यासाठी 6 आयजी दर्जाचे अधिकारी उदयपूरला पोहोचले आहेत. या घटनेत आणखी काही लोक किंवा दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता एनआयएने वर्तवली आहे. यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, आरोपी रियाज आणि गौस मोहम्मद ज्या दुचाकीवरून पळून जात होते, त्याचा क्रमांक 2611 आहे. योगायोगाने हा एकदा मुंबईवर झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तारखेशी मिळता जुळता आहे. या विशेष क्रमांकासाठी आरोपींनी आरटीओमध्ये 5000 रुपयांचा ड्राफ्ट सादर केला होता. आता तपास यंत्रणा या दुचाकी क्रमांकाबाबत तपास करत आहेत.दोन्ही आरोपी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होतेज्या निर्दयतेने मारेकऱ्यांनी कन्हैया लालची हत्या केली, ती घटना सामान्य गुन्हेगारी घटना नसून दहशतवादी घटना होती. तपास यंत्रणांच्या मते, त्याचा कट पाकिस्तानमध्ये लिहिला गेला होता. नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यापासून हे दोन्ही मारेकरी पाकिस्तानात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते. दोघेही पाकिस्तानच्या 8 ते 10 मोबाईल नंबरवर सतत बोलत होते.दहशत पसरवण्याच्या सूचना मारेकऱ्यांना पाकिस्तानकडून मिळत होत्या. कन्हैया लाल यांच्यानंतर हे दोन्ही मारेकरी उदयपूरमधील आणखी एका व्यावसायिकाची हत्या करणार होते. कन्हैय्या लालच्या मारेकऱ्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ आणि घौस हे आरोपी दहशतवादी आयएसआयएसशी संबंधित होते.रियाझ अत्तारी हा अलसुफाचा प्रमुख आहेरियाझ अत्तारी हा उदयपूरमधील ISIS च्या अलसूफा या रिमोट स्लीपर संघटनेचा प्रमुख आहे. मोबाइल, इंटरनेट कॉलिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाझ थेट आयएसआयएसच्या संपर्कात होता. रियाझ गेल्या पाच वर्षांपासून उदयपूर मोहम्मद घौसच्या सहकार्याने दहशतवादी मोहीम गुप्तपणे चालवत होता. दोन्ही दहशतवाद्यांनी उदयपूरच्या आसपासच्या तरुणांचे ब्रेनवॉश करण्यासाठी अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले होते.12 जून रोजी रियाझने खोली भाड्याने घेतली होती.आज तकची टीम मारेकरी रियाझच्या लपण्याच्या ठिकाणीही पोहोचली, जिथून पोलिसांना कन्हैया लालच्या हत्येतील दहशतवादी कटाशी संबंधित पुरावे मिळाले आहेत. रियाझने १२ जून रोजी खोली भाड्याने घेतली होती. राजस्थान पोलिसांनी टाळे ठोकले आहे. येथे हे कुलूप तोडण्यात आले आहे. पोलिसांनी येऊन तपास केला. बरेच काही जप्त केले आहे.

 

टॅग्स :TerrorismदहशतवादRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूPakistanपाकिस्तान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला