२२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:08 IST2026-02-17T10:08:09+5:302026-02-17T10:08:35+5:30

नवल किशोर चौधरी यांनी २२ डिसेंबर १९९२ कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. २० डिसेंबर रोजी नवल किशोर चौधरी यांनी सत्यानंद चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती

The Bihar court finally delivered its verdict on the Rs 225 dispute after 33 years; What was the punishment given to the accused? | २२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा? 

२२५ रूपयांच्या वादावर अखेर ३३ वर्षांनी कोर्टाने सुनावला निर्णय; आरोपींना काय सुनावली शिक्षा? 

मुझफ्फरपूर - फक्त २२५ रूपयांच्या वादाचा खटला कोर्टात तब्बल ३३ वर्ष चालला. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. २२५ रुपये हिसकावणे आणि मारहाण करणे असा हा प्रकार होता. हा खटला बिहारच्या कोर्टात सुरू होता. ज्याचा निकाल येण्यासाठी ३३ वर्ष वाट पाहावी लागली. १९९२ साली सुरू झालेला हा वाद कित्येक दशके कोर्टात प्रलंबित राहिला. सोमवारी न्यायाधीशांनी दीर्घकाळ रखडलेल्या या खटल्यावर अंतिम निर्णय दिला. या प्रकरणात ५ जणांवर आरोप लावले होते त्यातील २ आरोपी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच जग सोडून गेले.

३३ वर्षांनी काय दिला निर्णय?

मुझफ्फरपूर कोर्टाने साक्षीदारांच्या अभावी या खटल्यातील जीवित असलेले ३ आरोपी यांना निर्दोष मुक्तता केली आहे. सुनावणीवेळी आरोपींविरोधात कुठलेही ठोस पुरावे साद करण्यात तक्रारदारांना यश आले नाही. हा खटला कोर्टातील सर्वात दीर्घ काळ चालणारा खटला म्हणून पुढे आला. ३ दशकांहून अधिक काळ सुरू असलेला कायदेशीर लढा ना केवळ आरोपींच्या जीवनावर परिणाम करणारा ठरला तर इतक्या छोट्या वादावरही निर्णय घेण्यास कोर्टाला लागणारा इतका वेळ यावरून न्याय व्यवस्थेवर प्रश्न उभे राहिले आहेत.

जाणून घ्या प्रकरण

मुझफ्फरपूरमध्ये आपसांतील वादात मारहाण आणि २२५ रुपये हिसकवण्याचा हा वाद ३३ वर्ष न्यायालयात प्रलंबित राहिला. त्यात एकाच कुटुंबातील ५ जणांना आरोपी बनवण्यात आले होते. या दीर्घ काळ कायदेशीर लढाईत निर्णयापूर्वी २ आरोपींचा मृत्यू झाला तर उर्वरित ३ जणांना कोर्टाने पुराव्या अभावी निर्दोष सोडले. हा खटला १९९२ साली खरौना गावातील रहिवासी नवल किशोर चौधरी यांनी २२ डिसेंबर १९९२ कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. २० डिसेंबर रोजी नवल किशोर चौधरी यांनी सत्यानंद चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती. जमिनीतून झालेल्या वादातून आरोपींनी मारहाण करत बळजबरीने खिशातील २२५ रुपये हिसकावल्याचा आरोप नवल किशोर चौधरी यांनी केला होता. 

२२५ रूपये वादातून आणि मारहाणीतून एका कुटुंबाला ३ दशके कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. त्यात मुख्य आरोपी असलेल्या ५ जणांमधील सत्यदेव चौधरी आणि हरिशंकर चौधरी यांचा सुनावणीच्या काळात मृत्यू झाला. खटल्याच्या सुरुवातीच्या काळात जे युवा होते ते निर्णय येईपर्यंत वृद्धापकाळाकडे झुकले. अखेर ३ दशकांनी कोर्टाने आर्थिक वाद सोडवला आणि या आरोपातून तिघांनी निर्दोष मुक्तता केली.

Web Title : ₹225 के विवाद पर 33 साल बाद कोर्ट का फैसला; आरोपी बरी

Web Summary : मुजफ्फरपुर, बिहार में ₹225 के विवाद का 33 साल पुराना मामला खत्म हो गया। मारपीट और चोरी के आरोप में पांच लोग आरोपित थे। सबूतों के अभाव में अदालत ने तीन जीवित आरोपियों को बरी कर दिया, जबकि दो की मुकदमे के दौरान मौत हो गई, जो न्याय प्रणाली में देरी को उजागर करता है।

Web Title : 33-Year Court Battle Over ₹225 Ends; Accused Acquitted

Web Summary : A 33-year-old court case over ₹225 ended in Muzaffarpur, Bihar. Five individuals were accused of assault and theft. The court acquitted the three surviving defendants due to lack of evidence after two accused died during the prolonged trial, highlighting justice system delays.