उल्हासनगरात बँक मॅनेजरनेच लॉकरमधून दागिने केले लंपास, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:13 IST2022-06-23T20:12:12+5:302022-06-23T20:13:06+5:30
शहरातील सेंट्रल बँकेच्या मॅनेजरने रोमा आस्कनानी यांच्या लोकर्स मधून सोन्या चांदीचे असे एकून ७ लाख ७७ हजाराचे दागिने चोरून नेले.

उल्हासनगरात बँक मॅनेजरनेच लॉकरमधून दागिने केले लंपास, गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील सेंट्रल बँकेच्या मॅनेजरने रोमा आस्कनानी यांच्या लोकर्स मधून सोन्या चांदीचे असे एकून ७ लाख ७७ हजाराचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बँक मॅनेजर मयूर ठेले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-वुडलॅन्ड कॉम्प्लेक्स मधील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत रोमा कमलकुमार आस्कनानी यांचे लोकर्स आहे. २६ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान बँकेच्या लोकर्स मध्ये ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांची चोरी लोकर्स तोडून झाल्याची तक्रार रोमा आस्कनानी यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली. लोकर्स मध्ये ठेवलेल्या सोन्याचे ७ लाख ७७ हजाराचे दागिन्याची चोरी झाली. २२ जून २०२२ रोजी बँक मॅनेजर मयूर ठेले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम करीत असून बँक मॅनेजर ठेले व बँक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.