शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी नापास टोळीचा देशभरात धुडगूस, ओएलएक्सवरून कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 07:34 IST

सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सविता कदम, संदीप पाचांगणे यांच्यासह पोलिस नाईक सचिन सावंतसह २० जणांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

मुंबई : ओएलएक्सवरून जवान, पोलिस असल्याचे भासवून खरेदी करण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रासह देशभरातील १९ राज्यांतील नागरिकांना राजस्थान, उत्तर प्रदेशमधून गंडविणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांच्या ‘स्पेशल २०’ टीमने पर्दाफाश केला. या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीविरोधात राज्यासह भारतातून २७० तक्रारी समोर आल्या आहेत. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सविता कदम, संदीप पाचांगणे यांच्यासह पोलिस नाईक सचिन सावंतसह २० जणांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पाच दिवस सुरू असलेल्या या ऑपरेशनअंतर्गत सायबर पोलिसांनी टोळीचा म्होरक्यांपैकी एक सर्वसुख खुट्टा रुजदार ऊर्फ समशू  (३७, भरतपूर) यांच्यासह तुलसीराम रोडुलाल मीणा (२५, जयपूर), अजित शिवराम पोसवाल (१९, भरतपूर), इरसाद सरदार (२४, मथुरा) या चौकडीला अटक केली आहे.  आरोपींकडून ९ मोबाइल फोन, ३२ विविध बँकांचे डेबिट कार्ड, चेकबुक, १   चेकबुक, ४ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३५ मोबाइल क्रमांक, ३८ आयएमईआय क्रमांक प्राप्त झाले असून त्याबाबतही अधिक तपास सुरू आहे. सुरतहून  मुंबईत बदली झालेल्या तक्रारदाराने फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. आरोपींनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे भासवून संपर्क साधला. पुढे, पैसे पाठविण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून अवघ्या दोन तासांत १२ व्यवहार त्यांच्या खात्यातील १७ लाख ८२ हजार रुपयांवर डल्ला मारला. हे प्रकरण सायबर पोलिसांकडे येताच तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पथकाने शोध सुरू केला. याच, तपासातून राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंतच्या या टोळीपर्यंत पथक पोहोचले. 

असे चालते काम... चार टप्प्यांमध्ये या टोळीचे कामकाज चालते. यामध्ये ओएलएएक्सवर नवीन येणाऱ्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्याशी बोलणारे, माहिती देणारे आणि पैसे काढणारे असे ग्रुप आहेत. प्रत्येक टप्प्यात कमिशनचे रेटदेखील ठरले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी... नागरिकांनी ओएलएक्सवरून व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. या टोळीकडून जवान, पोलिस असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. कुठलीही खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नका. फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा. या टोळीविरोधात २६९ तक्रारी आल्या असून राज्यातील १४ तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, तेलंगणामध्ये देखील ५०० हून अधिक तक्रारी असल्याची माहिती मिळत असून ते प्रकरणदेखील  तपासासाठी घेण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. - बालसिंग राजपूत, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा, मुंबई

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी