शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत बेशुद्ध पडून मृत्यू पावलेल्या ‘त्या’ मुलाचा घातपात झाल्याचा संशय! शिक्षणाधिकाऱ्यांनीही नेमली चौकशी समिती

By जितेंद्र कालेकर | Updated: January 12, 2023 23:06 IST

...त्याला एका भांडणातून अज्ञात मुलाने छातीवर बसून गळा दाबल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांनी कापूरबावडी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात व्यक्त केला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६४ मध्ये चौथीतील विद्यार्थी कुणाल शंकर चंदनशिव याचा अचानक बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्याला एका भांडणातून अज्ञात मुलाने छातीवर बसून गळा दाबल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांनी कापूरबावडी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात व्यक्त केला आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी गुरुवारी सांगितले.

कुणालच्या मृत्यूचे नेमके कारण समजल्याशिवाय आणि संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मुलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पालकांनी बुधवारी रात्री घेतली होती. गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन झाले. या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन कापूरबावडी पोलिसांनी दिले. तसेच ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी राक्षे यांनीही पालिका स्तरावर चौकशी समिती नेमत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पालकांनीही नरमाईची भूमिका घेत कुणालवर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले.मानपाडा येथील महापालिकेच्या शाळेत दुपारच्या सुमारास कुणाल अचानक बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध पडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी आणण्याऐवजी तिथेच वेळ वाया घालवला, असा आरोप नातेवाइकांनी केला होता. प्रत्यक्षात कुणाल बुधवारी दुपारी ३:२७ च्या सुमारास पडला. त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात ३:३० वाजता नेल्याचा दावा शिक्षकांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तो पडल्यानंतर त्याच्या तोंडाला फेसही आला होता. मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनीही चौकशीची मागणी केल्याने या सर्वच प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी