शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 06:48 IST

भावाला ठार मारण्याची धमकी देत केला गर्भपात. आरोपीला पोलिसांकडून अटक.

ठळक मुद्देभावाला ठार मारण्याची धमकी देत केला गर्भपात.आरोपीला पोलिसांकडून अटक.

ठाणे : विवाहित असूनही लग्नाचे तसेच नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कामेश मरोठीया (२८, रा. चिरागनगर, ठाणे) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

कामेश हा ठाण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहे. त्याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले आहे. विवाहित असल्याची बाब लपवून ठेवून त्याच कंपनीत नोकरी शोधण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीशी त्याने १४ जून २०२० रोजी नोकरी लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. तो तिच्यावर खरे प्रेम करीत असल्याचे तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना त्याने भासविले. तसेच तिच्या मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजही केले. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही तिला एकांतात भेटून तिला रक्ताचा टिळक लावून तिला पत्नी म्हणून स्वीकारल्याचे तसेच लवकरच त्याच्या आई-वडिलांना सांगून तिच्याशी लग्न करणार असल्याचाही त्याने बहाणा केला. त्याच बहाण्याने त्याच्या आई-वडिलांना भेटण्याचे निमित्त करून १४ जून २०२० रोजी आणि त्यानंतरही तीन दिवसांनी चिरागनगर येथील त्याच्या घरी बोलावून तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात ती गरोदरही राहिली. यातून आपले बिंग फुटेल म्हणून त्याने तिला समतानगर येथील एका खासगी रुग्णालयात १६ ऑक्टोबर २०२० रोजी तिला दाखल करून तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले.

सध्या मूल जन्मास घालणे आपल्यासाठी चांगले नसल्याचे सांगून तिच्यावर दबाव आणून भावाला ठार मारण्याची धमकी देत गर्भ पाडण्यासाठीही दबाव आणला. नंतर गर्भपात करण्यास सहमती मिळवून तिचा विश्वासघात केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताव या प्रकाराबद्दल तरुणीने त्याच्याविरूद्ध ७ जुलै रोजी लैंगिक अत्याचार, धमकी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट नाले, पोलीस नाईक प्रशांत बुरके आणि संदीप भांगरे आदींच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कामेश याला कोपरखैरणे येथून १० जुलै २०२१ रोजी अटक केली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन ढोले हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाmarriageलग्नjobनोकरी