ठाणे खंडणी पथकाची कारवाई, बेकायदेशीर शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 15:33 IST2020-03-20T15:31:04+5:302020-03-20T15:33:13+5:30
ही कारवाई गुरुवारी रात्री केली असून त्याला येत्या २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे खंडणी पथकाची कारवाई, बेकायदेशीर शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकाला अटक
ठाणे - विनापरवाना बेकायदेशीर अग्निशस्त्रसाठा विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील गौतम दशरथ तांगडी (४२) याला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एका बंदुकासह आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री केली असून त्याला येत्या २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आय 20 या कारमधून एक जण विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठा विक्रीसाठी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम,खारटन रोड येथे येणार असल्याची ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून गौतम याला पकडले. त्याच्याकडून शस्त्रसाठा हस्तगत करत त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ठाणे न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मिळून आलेला शस्त्रसाठा त्याने कुठून आणला आणि तो कोणाला विक्रीसाठी आला होता याचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.