केस बारीक कापले म्हणून लहान भावाला आला राग, 16व्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:33 IST2023-04-06T11:32:52+5:302023-04-06T11:33:24+5:30

Thane : भाईंदरमध्ये ही घटना घडली असून इथे एका 13 वर्षीय मुलाने केवळ या कारणाने जीव दिला की, त्याचे केस बारीक कापण्यात आले होते. यावरून तो खूप रागावला होता. गेल्या मंगळवारी ही घटना घडली.

Thane : 13 years old child committed suicide after troubled by short hair cutting jumped from 16th floor | केस बारीक कापले म्हणून लहान भावाला आला राग, 16व्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

केस बारीक कापले म्हणून लहान भावाला आला राग, 16व्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

Thane : आपले केस सगळ्यांनाच प्रिय असतात. पण कुणी आपले केस मनासारखे कापले नाही म्हणून आपलं जीवन संपवतं का? नाही ना...! पण अशीच एक धक्कादायक घटना ठाणे शहरातून समोर आली आहे. भाईंदरमध्ये ही घटना घडली असून इथे एका 13 वर्षीय मुलाने केवळ या कारणाने जीव दिला की, त्याचे केस बारीक कापण्यात आले होते. यावरून तो खूप रागावला होता. गेल्या मंगळवारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी मुलाच्या चुलत भावाने त्याला केस कापण्यासाठी सोबत नेलं होतं. चुलत भावाने लहान भावाचे केस बारीक करायला सांगितले. ज्यामुळे मुलगा फारच नाराज झाला होता. तो रागाने लाल झाला होता.

त्याच्या मनातून केस बारीक केल्याचा हा राग शांत झाला नाही. जेव्हा घरातील सगळे लोक रात्री झोपले होते तेव्हा 13 वर्षीय मुलगा बाथरूमला गेला. त्यानंतर त्याने बाथरूमच्या खिडकीमधून खाली उडी मारली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

असं सांगण्यात आलं की, भाईंदरच्या एका इमारतीच्या 16व्या मजल्यावर 13 वर्षीय मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचे केस त्याच्या चुलत भावाने बारीक केले होते. केस कापल्यापासून मुलगा रागावला होता. या रागात त्याने बाथरूमच्या खिडकीतून खाली उडी मारली आणि यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
 

Web Title: Thane : 13 years old child committed suicide after troubled by short hair cutting jumped from 16th floor