शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बिद्रे हत्याकांडप्रकरणी सायबर तज्ज्ञाची साक्ष; आरोपीचा टाइमलाइन नकाशा सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 09:06 IST

हत्येच्या दिवशी बिद्रे आणि आरोपी अभय कुरुंदकर यांचा एकत्र असलेला टाइमलाइनचा नकाशा न्यायालयासमोर सादर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी शेवटच्या टप्प्यात आहे. पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती  के. जी. पढेलवार यांच्या कोर्टासमोर शुक्रवारी सुनावणीदरम्यान या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार सायबर तज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण झाली. हत्येच्या दिवशी बिद्रे आणि आरोपी अभय कुरुंदकर यांचा एकत्र असलेला टाइमलाइनचा नकाशा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. ८ जुलै रोजी बंगेरा यांच्या साक्षीला सुरुवात झाली होती.

बंगेरा यांनी बिद्रे यांच्या मोबाइलवरून आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाइलवरून आणि फेसबुक, व्हॉट्सॲप, लॅपटॉप, सर्व सोशल ॲपमधून महत्त्वाचा डेटा रिकव्हर केला होता. कुरुंदकरच्या आरती कुरुंदकर@जीमेल डॉट कॉम’ हा मेल आयडी ओपन करून गुगल ड्राइव्हमधील व्हॉट्सॲप नंबर नवीन मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले आणि त्यावरील व्हॉट्सॲप चॅटच्या प्रिंटआऊट काढल्यानंतर त्यावर सह्या केल्या होत्या. त्या कोर्टात दाखविल्या असता ओळखल्या. हत्येच्या दुसऱ्या रात्री १२.२२ ते १.१२ पर्यंत कुरुंदकर, इतर आरोपी वसई खाडी परिसरात चालत असल्याचा  तो नकाशा कोर्टास दाखविल्यावर तोही मान्य केला.

१२ ऑगस्टला होणार उलटतपासणी     बिद्रे यांच्या ईमेल आयडीवरून गुगल ड्राइव्हच्या टाइमलाइन गेल्यावर कुरुंदकर आणि बिद्रेचे  एकत्र असलेले ५० फोटो आणि त्याच्या प्रिंटआऊट काढल्यानंतर त्यावर सह्या केल्या होत्या. ते कोर्टासमोर दाखविल्यावर त्या आपणच काढल्या आहेत, अशी साक्ष बंगेरा यांनी दिली.    बंगेराची साक्ष पूर्ण झाली. आता १२ ऑगस्ट रोजी उलटतपासणी होणार आहे. शुक्रवारी कोर्टात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, राजू गोरे,  एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी, आरोपीचे वकील आणि आरोपी हजर होते.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण