दहशतवादी कैद्याचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला : नागपूर मध्यवर्ती तुरुंगात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:14 AM2020-02-26T00:14:38+5:302020-02-26T00:16:31+5:30

मुंंबई लोकलमध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी नावेद हुसैन खान याने एका दुसऱ्या कैद्याच्या मदतीने तुरुंगातील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. दोघांनी सुरक्षा रक्षकास मारहाण केली. मंगळवारी सकाळी नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Terrorist prisoner attacks on security guards | दहशतवादी कैद्याचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला : नागपूर मध्यवर्ती तुरुंगात खळबळ

दहशतवादी कैद्याचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला : नागपूर मध्यवर्ती तुरुंगात खळबळ

Next
ठळक मुद्देमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंंबई लोकलमध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी नावेद हुसैन खान याने एका दुसऱ्या कैद्याच्या मदतीने तुरुंगातील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. दोघांनी सुरक्षा रक्षकास मारहाण केली. मंगळवारी सकाळी नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. धंतोली पोलिसांनी नावेद खान रशीद खान (४०) आणि मो. आजम असलम बट (४०) यांच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
२००६ मध्ये मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाºया लोकल रेल्वेत सिरीयल बॉम्बस्फोट झाले होते. यात १८९ लोकांचा जीव गेला होता तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. २०१७ मध्ये नावेद खानसह पाच लोकांना फाशीची तर इतर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठाण्यात आली होती. असे सांगितले जाते की, फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर नावेदसह अनेक दहशतवादी नागपूरच्याच तुरुंगात कैद आहेत. त्यांना फाशी यार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता नावेद, मो. आजमसह इतर कैद्यांना नाश्त्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. नावेद आणि आजम यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. फाशी यार्डमधून निघाल्यानंतर नावेद पुन्हा आजमशी वाद घालू लागला. पाहता-पाहता दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तुरुंगात खळबळ उडाली. तुरुंग निरीक्षक ईश्वरदास बाहेकर यांनी मध्यस्ती करीत दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोघेही संतापले आणि बाहेकर यांनाच मारहाण करू लागले. त्यांना धक्का देऊन खाली पाडले. हे पाहून इतर सुरक्षा रक्षक मदतीसाठी धावले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली. अधिकारीही लगेच तुरुंगात पोहोचले. त्यांनी नावेद आणि आजमची वेगवेगळी विचारपूस केली. त्यांना वेगवेगळे ठेवून धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धंतोली पोलिसांनी नावेद व आजम विरुद्ध शासकीय कर्मचाºयास मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे तुरुंगात खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात मोठ्या संख्येने दहशतवादी आणि नक्षली कैदी आहेत. याकुब मेमनला फाशी दिल्यापासून नागपूर जेल तसाही चर्चेत आहे. ताज्या मारहाणीच्या घटनेतील नावेद हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याने मुंबईवरील हल्ला प्रतिबंधित संघटना सिमीच्या वतीने पाकिस्तानच्या मदतीने केला होता. नावेदचा साथीदार मो. सैफल शेख हा याचा मुख्य सूत्रधार होता. तो लष्कर ए-तयब्बाचा मुंबई शाखेचा प्रमुख होता. त्यालाही फाशीची शिक्षा झाली आहे. त्याला बॉम्बस्फोटासाठी हवालामार्फत पैसे पाठवण्यात आले होते. त्यांनी लोकल ट्रेनसह वर्ल्ड ट्रेड सेंटर, स्टॉक एक्स्चेंजसह अनेक धार्मिक ठिकाणांची रेकी केली होती. यानंतर प्रेशर कुकरमध्ये स्फोटाचे साहित्य ठेवून स्फोट घडविला होता.

Web Title: Terrorist prisoner attacks on security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.