Terrorist gang disappears in Shivajinagar area | शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणारी टोळी गजाआड

शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणारी टोळी गजाआड

मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंड मोहम्मद मुक्तार शेख व त्याच्या टोळी विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुक्तार व त्याच्या टोळीने विभागात आपली दहशत कायम ठेवण्यासाठी २००८ पासून लोकांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, गंभीर दुखापत करणे, हत्यारांसह दंगलीत सहभाग घेणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, दरोडा टाकणे, अतिक्रमण करणे, दंगा करणे अशा अनेक गुन्ह्यांची मालिका केली आहे. संपूर्ण गोवंडी परिसरात आपली दहशत रहावी यासाठी टोळीतील सर्व गुंड आपल्याजवळ हत्यार बाळगून नागरिकांना त्रास देत होते.  महिलेने तक्रार दिल्याचा राग मनात ठेवत त्या महिलेच्या पतीला या टोळीतील सात जणांनी मिळून तलवारीने व दगडाने मारून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मुक्तार शेख (२९), जुबेर शेख (२२), इरफान शेख (२८), रिजवान शेख (२६), मोहसीन शेख (२४) यांना अटक केली आहे. यापैकी मुजबीर खान (३०) व अल्फराज खान (३३) हे आरोपी फरार आहेत.

Web Title: Terrorist gang disappears in Shivajinagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.