शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 06:50 IST

‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला आहे.

- आशिष सिंहलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेली इंदूर येथील सर्फराज मेमन ही संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत पोहोचली असून, तो घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) ई-मेलद्वारे पाठविल्याने मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांचीही झोप उडाली आहे. या सर्फराज मेमनला हुडकून अटक करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला आहे. त्यानुसार इंदूरच्या धाररोड परिसरात राहणारा सर्फराज मेमन हा ४१ वर्षांचा असून, त्याच्या पासपोर्टवर २०१८-२०१९ वर्षातील चीनला भेट दिल्याचा शिक्का आहे. त्याच्या पासपोर्टचा अधिक तपशील तपासयंत्रणांकडून गोळा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

रविवारी एनआयएला या संदर्भात एक मेल बेनामी ई-मेल आयडीद्वारे आला होता. त्यात या सर्फराज मेमनचा उल्लेख करीत त्याचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, लिव्हिंग सर्टिफिकेटचा तपशील जोडण्यात आला होता. ही सारी माहिती एनआयएने सर्व तपास यंत्रणांना पाठवत सर्फराजला रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला