कर्नाटकात श्रद्धा वालकरसारखे भीषण प्रकरण, मुलाने केले बापाचे 32 तुकडे; कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 16:31 IST2022-12-13T16:24:30+5:302022-12-13T16:31:49+5:30
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखे प्रकरण कर्नाटकात घडले आहे.

कर्नाटकात श्रद्धा वालकरसारखे भीषण प्रकरण, मुलाने केले बापाचे 32 तुकडे; कारण काय..?
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती कर्नाटकात झाली आहे. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये एका मुलाने आपल्याच वडिलांची लोखंडी सळईने वार करुन हत्या केली. यानंतर वडिलांच्या शरीराचे 32 तिकडे करुन बोरवेलमध्ये फेकून दिले. बोरवेलमधून शरीराचे तुकडे सापडल्यानंतर हत्येचा खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विठला कुलाली याने रागाच्या भरात वडील परशुराम कुलाली (53) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. कर्नाटकातील बागलकोट येथे 6 डिसेंबर रोजी ही घटना घडली. हत्येनंतरही 28 वर्षीय आरोपीने आपल्या वडिलांच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले आणि ते तुकडे उघड्या बोअरवेलमध्ये फेकून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम अनेकदा दारूच्या नशेत आपल्या दोन मुलांपैकी लहान असलेल्या विठलाला शिवीगाळ करत असे. परशुरामची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात. गेल्या मंगळवारी वडिलांनी शिवीगाळ केल्यामुळेच विठलाने रागाच्या भरात वडिलांची हत्या केली. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.