Buldhana-Nagpur Bus Accident: बाळापूरमध्ये भीषण अपघात! कोळशाच्या ट्रकला धडक दिल्यानंतर एसटी बसने घेतला पेट; ७ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:37 PM2021-10-06T17:37:34+5:302021-10-06T18:03:29+5:30

बुलडाणा-नागपूर बसला बाळापूरनजीक अपघात; जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Terrible accident! ST bus caught fire after hitting coal transport truck; 7 passengers injured | Buldhana-Nagpur Bus Accident: बाळापूरमध्ये भीषण अपघात! कोळशाच्या ट्रकला धडक दिल्यानंतर एसटी बसने घेतला पेट; ७ प्रवासी जखमी

Buldhana-Nagpur Bus Accident: बाळापूरमध्ये भीषण अपघात! कोळशाच्या ट्रकला धडक दिल्यानंतर एसटी बसने घेतला पेट; ७ प्रवासी जखमी

googlenewsNext

बुलडाणा/बाळापूर: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शेळद फाट्यानजीक बुलडाणा आगाराच्या नागपूरला जाणाऱ्या बसचा आणि कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये बस व ट्रक जळून खाक झाले आहे. दरम्यान या अपघातामध्ये बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये बस चालकाचाही समावेश आहे. (Buldhana-Nagpur Bus Accident)

हा अपघात ६ ऑक्टोबर रोजी झाला. बुलडाणा आगाराची बुलडाणा-नागपूर ही एमएच-४०-एक्यू ६१६० क्रमांकाची बस सकाळी १०:४५ वाजता नागपूरसाठी निघाली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास या बसची आणि कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची (युपी-७०-जीझेड-०५१५) समोरा समोर धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर बस व ट्रकने पेट घेतला. या अपघातामध्ये बस जळून खाक झाली. या अपघातामध्ये बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्रवासी
दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यावेळी बाळापूर पोलिसांचे एक वाहन अकोला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खिरपूरी देवगाव येथे पोलिस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्तासाठी जात होते. या दरम्यानच बस व ट्रकची धडक होऊन अपघात झाला. बसने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांनी तेथे धाव घेत बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

चालकासह ७ जखमी
या अपघातामध्ये बस चालक एन. टी. लहाने (रा. बुलडाणा) यांना अधिक मार लागला असल्याचे स्थानिकंचे म्हणणे आहे. दरम्यान या बसवर वाहक म्हणून जे. बी. साळवे हे होते. बस चालकासह बसमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमींची नावे मात्र मिळू शकली नाही.

जखमींवर अकोल्यात उपचार सुरू
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर अकोला येथे उपचार सुरू असून अपघातामध्ये सात प्रवाशी जखमी झाले आहेत. बुलडाणा-नागपूर बस आणि ट्रकला हा अपघात घडला आहे. बसवर चालक म्हणून एन. टी. लहाने आणि वाहक म्हणून जे. बी. साळवे हे कर्तव्यावर होते, अशी माहिती बुलडाण्याचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.

Web Title: Terrible accident! ST bus caught fire after hitting coal transport truck; 7 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.