शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 4:14 AM

देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

- जमीर काझी मुंबई : देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा महिन्यांत ऑनलाइन गैरव्यवहार, फसवणुकीच्या तब्बल २,७८९ गुन्ह्यांची नोंद राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे. साधारणपणे दररोज १० सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल होत आहेत. १ जानेवारी, २०१५ ते ३१ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत एकूण तब्बल १०,१३९ गुन्हे दाखल झाले आहेत.

राज्यभरात डेबिट, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक फसवणुकीबरोबरच नोकरी, विवाह नोंदणीबरोबरच सोशल मीडियातील गुन्ह्यांच्या प्रमाणाचा आलेख सातत्याने वाढत राहिलेला आहे. त्यावर प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्याला मर्यादा पडत आहेत, तसेच नागरिकही आपल्या सायबर सुरक्षेबाबत गाफील राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.

माहिती अधिकार तंत्रज्ञान कायद्यांतर्गत या वर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर दहा महिन्यांमध्ये एकूण २,७८९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९८६ गुन्हे आॅनलाइन बॅँकिंगचे आहेत. त्यानंतर डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ८३३ तक्रारींची नोंद झालेली आहे. त्या खालोखाल सोशल मीडियाद्वारे फसवणूक झालेले ७७९ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फसवणुकीचे ५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सायबर गुन्ह्याच्या प्रतिबंध व तपासासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दैनंदिन व्यवहारामध्ये इंटरनेट व आॅनलाइनचा वापर कैकपटीने वाढत आहे. त्याचा वापर करणाऱ्यांनी त्यासंबंधी योग्य खबरदारी घेतली पाहिजे. बॅँक खाते, ओटीपी क्रमांक इतरांना सांगू नयेत, त्यासंबंधी खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे.- बाळसिंग रजपूत, अधीक्षक, राज्य सायबर गुन्हे प्रतिबंधक विभाग

या वर्षी ३१ ऑक्टोबरअखेर दाखल सोशल मीडिया व ई-मेलसंबंधी गुन्हे

प्रकार गुन्हे

सोशल मीडिया ५४९ई-मेल २४अन्य २०६एकूण ७७९

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस