ब्लॅकमेलिंगचा हायटेक मार्ग! आमदाराला अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे केलं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:41 IST2025-03-08T13:40:30+5:302025-03-08T13:41:15+5:30

काँग्रेस आमदार वेमुला वीरेशम यांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

telangana mla blackmailed nude video call cyber fraud | ब्लॅकमेलिंगचा हायटेक मार्ग! आमदाराला अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे केलं टार्गेट

ब्लॅकमेलिंगचा हायटेक मार्ग! आमदाराला अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे केलं टार्गेट

तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार वेमुला वीरेशम यांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना आक्षेपार्ह व्हिडीओ कॉल केला आणि त्याला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. मंगळवारी रात्री नकरेकल येथील आमदाराला एका अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर ही भयंकर घटना घडली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदाराला आलेल्या व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रीनवर एक महिला दिसत होती. यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतला आणि आमदाराला धमकी दिली की जर त्याने पैसे दिले नाहीत तर हा व्हिडीओ त्याच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना पाठवला जाईल. हे प्रकरण सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे. ज्यामध्ये गुन्हेगार व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना अडकवतात आणि ब्लॅकमेल करतात.

या अनपेक्षित घटनेनंतर आमदार वीरेशम यांनी क्षणाचाही विलंब न करता फोन डिस्कनेक्ट केला आणि तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे व्हिडीओ कॉल मध्य प्रदेशातून करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

ब्लॅकमेलिंगचा हायटेक मार्ग

पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सायबर गुन्हेगारांची ही एक नवीन पद्धत आहे. ज्यामध्ये ते अचानक सोशल मीडिया किंवा व्हॉट्सएपद्वारे एखाद्याला व्हिडीओ कॉल करतात आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू करतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये लोक भीतीपोटी पैसे देतात. पण आमदार वीरेशराम यांनी सतर्कता दाखवली आणि तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

आमदाराने लोकांना केलं अलर्ट

माध्यमांशी बोलताना आमदार वीरेशम म्हणाले की त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि सर्व नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. जर कोणाला असे संशयास्पद कॉल आले तर घाबरून जाण्याऐवजी ताबडतोब पोलिसांना कळवा, असे ते म्हणाले. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांना बळी पडू नये असा सल्ला दिला.

Web Title: telangana mla blackmailed nude video call cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.