शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

'सामूहिक बलात्कारात तेलंगणाच्या गृहमंत्र्यांच्या नातवाचा सहभाग नाही', पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 20:02 IST

Gangrape Case : शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणात गृहमंत्र्यांच्या नातूचा सहभाग नसल्याचा दावा पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी केला.

हैदराबादमध्ये मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन नेत्यांच्या मुलांची नावे समोर येत होती, मात्र शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणात गृहमंत्र्यांच्या नातूचा सहभाग नसल्याचा दावा पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी केला.

ते म्हणाले की, पीडितेचे म्हणणे, सीडीआर तपास आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार तो पाच आरोपींमध्ये नव्हता. याशिवाय एआयएमआयएम आमदाराच्या मुलाविरुद्धही कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पोलीस पुढे म्हणाले की, एका प्रमुख नेत्याच्या (टीआरएस नेते आणि वक्फ बोर्ड अध्यक्ष) मुलाविरुद्ध पुरावे सापडले आहेत.टीआरएस नेत्याच्या गाडीत सामूहिक बलात्कारमर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. ज्या मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाला ती बोर्ड अध्यक्षांची होती आणि बोर्ड अध्यक्ष हे टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) नेते आहेत, असा आमदार कुटुंबीयांचा दावा आहे.सामूहिक बलात्काराच्या वेळी आमदाराचा मुलगा कॅफेमध्ये होताडीसीपीच्या वक्तव्यापूर्वी आमदाराच्या कुटुंबीयांनीही दावा केला की, त्यांचा मुलगा गाडीतून खाली उतरला होता. पबमधून बाहेर पडल्यानंतर तो ज्युबली हिल्स येथील कॅफेमध्ये तासाभराहून अधिक काळ होता. यानंतर त्याचा भाऊ त्याला तेथून घेऊन गेला. घटनेच्या वेळी तो कारमध्ये नव्हता. काका अमेरिकेला जात असल्याने तो आरोपींसोबत नव्हते आणि तो त्यांना भेटायला गेला होता.पाच आरोपींची ओळखडीसीपी म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित पाच आरोपींची ओळख पटली आहे. त्यापैकी तीन अल्पवयीन आहेत तर दोन प्रौढ आहेत. सदुद्दीन मलिक आणि उमर खान अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी सांगितले की, सीडीआर आणि इतर तांत्रिक माहितीची छाननी केली जात आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत. लवकरच पीडितेचा जबाब नोंदवला जाईल.भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलातेलंगणा भाजपने अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचवेळी पोलीस याप्रकरणी संथगतीने कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातला.

पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेपअल्पवयीन 28 मे रोजी पार्टीला गेला होतापीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, 28 मे रोजी त्यांची मोठी मुलगी एका पार्टीला गेली होती. अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पब, रोड नंबर 36, जुबली हिल्समध्ये, तिच्या मुलीचे मित्र सूरज आणि हादी यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. ज्यासाठी तिला आमंत्रित केले होते.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, संध्याकाळी 5.30 च्या सुमारास काही लोक माझ्या मुलीला लाल रंगाच्या मर्सिडीज कारमधून पबच्या बाहेर घेऊन गेले. यादरम्यान एक इनोव्हा कारही बाहेर आली. कारमधील लोकांनी माझ्या मुलीशी गैरवर्तन केले. तेव्हापासून माझ्या मुलीला जबर धक्का बसला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीत्याचवेळी हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अजूनही तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहेत. आयपीसी कलम 354 आणि 323 व्यतिरिक्त, पोलिसांनी पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आयपीसीचे कलम 376 देखील जोडले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMLAआमदारcarकार