... म्हणून विद्यार्थ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 18:18 IST2018-08-29T18:12:02+5:302018-08-29T18:18:59+5:30
त्रिपुराची राजधानी अगळरता येथील शाळेतील शिक्षकाने 18 वर्षीय विद्यार्थ्यांला त्याच्या गर्लफ्रेंडकडून जबरदस्तीने राखी बांधायला लावली. त्यामुळे या विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

... म्हणून विद्यार्थ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
अगरतळा : त्रिपुराची राजधानी अगळरता येथील शाळेतील शिक्षकाने 18 वर्षीय विद्यार्थ्यांला त्याच्या गर्लफ्रेंडकडून जबरदस्तीने राखी बांधायला लावली. त्यामुळे या विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
‘डेक्कन क्रॉनिकल’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शाळेचे प्राध्यापक आणि काही शिक्षकांनी सोमवारी दिलीप कुमार साहा या विद्यार्थ्याला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला कार्यालयात बोलविले होते. तसेच, त्यांच्यासोबत त्यांच्या आई-वडिलांना बोलविले होते. यावेळी एका शिक्षकाने गर्लफ्रेंडला जबरदस्तीने दिलीप कुमार साहाच्या हाताला राखी बांधण्यास सांगितले. तेव्हा दिलीप कुमार साहा यांने नकार दिला आणि शाळेच्या इमारतीवरुन उडी मारली. यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी शाळेच्या प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आंदोलन केले. तसेच, याप्रकरणात सामील असलेल्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याचबरोबर, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरु केला आहे.