शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात जाण्यावरून शिक्षक दाम्पत्यात झाला वाद; पतीने पत्नी अन् मुलाची केली हत्या, नंतर केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 15:24 IST

मृत व्यक्ती गिर्राज मीणा येथे भाड्याच्या घरात परिवारासोबत राहत होता. तो बूंदी येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होता.

कोरोना महामारीमुळे एकीकडे लोकांचा श्वास गुदमरला जातोय तर दुसरीकडे अशा संकटाच्या काळातही लोक मानसिक रूपाने त्रासले आहेत. त्यामुळे ते अनेकदा घातक पाउल उचलतात. राजस्थानच्या जयपूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका शिक्षक दाम्पत्यात काही कारणाने वाद झाला. ज्यात पतीला इतका राग आला की, त्याने पत्नी आणि १३ महिन्यांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली. इतकंच नाही तर नंतर आरोपीने फाशी घेऊन स्वत:ला संपवलं.

दोघेही केंद्रीय विद्यालयात होते शिक्षक

ही खळबळजनक घटना जयपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनमधील आहे. इथे हे शिक्षक कपल राहत होतं. असे सांगितलं जात आहे की, मृत व्यक्ती गिर्राज मीणा येथे भाड्याच्या घरात परिवारासोबत राहत होता. तो बूंदी येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी समिता मीणा ही सुद्धा शिक्षिका होती. ती जयपूरच्या केंद्रीय विद्यालयात शिकवत होती. त्यांना १३ महिन्यांना मुलगा होता. (हे पण वाचा : अरे देवा! गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्यासाठी मुलाकडून स्वत:च्या बापाची हत्या, १० लाखांची दिली होती सुपारी...)

लग्नात जाण्यावरून झाला वाद आणि....

असे सांगितले जात आहे की, पत्नी समिता मीणाच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. ज्यासाठी त्यांना परिवारातील लोक येण्यासाठी तगादा लावत होते. मात्र, पती गिर्राज मीणा याचं लग्नात जायचं मन नव्हतं. अशात त्याने पत्नीलाही लग्नात जाण्यास मनाई केली. यावरूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. यादरम्यान गुरूवारी सायंकाळी पती-पत्नीत या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर गिर्राजने हे धक्कादायक पाउल उचललं. (हे पण वाचा : ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती नवरी, मोबाइलवर नवरदेवाचा मेसेज आला अन् ऐनवेळी मोडलं लग्न...)

पत्नी आणि मुलाची हत्या केल्यावर पती गिर्राजने फाशी घेऊन आत्महत्या केली. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा समिताच्या वडिलांनी घरी फोन केल्यावर काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर पोलिसात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली. त्यांना घरात जे दिसलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यात फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी