शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

टॅक्सी चालक ते ISI अन् डी गॅंगचा हस्तक..कोण आहे जान मोहम्मद अली शेख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 21:58 IST

Jan Mohammad Ali Shaikh : त्याला दोन मुलीही आहेत, एका मुलीचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, तर  दुसरी मुलगी शाळेत जातेय. जान मोहम्मद शेख एटीएसच्याही रडारवर होता. मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवायचा त्याला अनुभव होता.

ठळक मुद्देसायनच्या केलाबखार परिसरात खोली क्रमांक १८५ मध्ये तो राहत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला अमली पदार्थाचे देखील व्यसन असल्याची माहिती मिळत आहे. 

दिल्लीपोलिसांनी अटक केलेल्या दहशतवादी जान मोहम्मद अली शेख हा मुंबईचा राहणारा आहे. मुंबईच्या सायनमध्ये धारावीतील झोपडपट्टीत राहणारा ४७ वर्षीय जान मोहम्मद दिल्लीपोलिसांच्या अटकेत आहे. एक सर्वसामान्य टॅक्सीचालक दाऊदच्या आमिषाला भुलला. कर्जबाजारी जान मोहम्मद हा टॅक्सीचालक आहे. सायनच्या केलाबखार परिसरात खोली क्रमांक १८५ मध्ये तो राहत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला अमली पदार्थाचे देखील व्यसन असल्याची माहिती मिळत आहे. 

त्याला दोन मुलीही आहेत, एका मुलीचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, तर  दुसरी मुलगी शाळेत जातेय. जान मोहम्मद शेख एटीएसच्याही रडारवर होता. मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवायचा त्याला अनुभव होता. त्यामुळे अर्थातच मुंबईतील गल्लीबोळ्याची आणि ररस्त्यांची त्याला चांगली माहिती होती. गणपती, नवरात्रीत मुंबईत घातपात करायची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येणार होती. १३ तारखेला मुंबई सेंट्रलवरुन जान मोहम्मद दिल्लीला रवाना झाला. मुंबईतला एक कसलेला टॅक्सीड्रायव्हर. ज्याला मुंबईतला कानाकोपरा माहिती आहे आणि जो कर्जाच्या बोजाखाली दाबला गेलाय. त्यामुळेच पैशाचं आमिष दाखवून जान मोहम्मदला डी-गँगनं जाळ्यात ओढलं असावं, असा एटीएसने संशय व्यक्त केला आहे.

दिल्ली विशेष पोलिसांना जे दहशतवादी सापडले आहेत, त्यांचं कनेक्शन आयसिस आणि डी गॅंगशी आहे. त्यात धारावीत राहणारा मोहम्मद जान हा धारावीत लहानाचा मोठा झालाय. त्याचे आई- वडिलांचा काही वर्षापूर्वी निधन पावले होते. 

टॅग्स :terroristदहशतवादीMumbaiमुंबईISIआयएसआयDawood Ibrahimदाऊद इब्राहिमArrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिसAnti Terrorist Squadएटीएस