शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी तांत्रिकाने अडीच वर्षाच्या मुलाचा दिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:28 IST

Child sacrificed to pleased chamunda devi : पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याची शक्ती संपत चालली आहे. म्हणून ताकद बळकट करण्यासाठी चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने चिमुरड्याचा बळी दिला आहे. 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तांत्रिकाने चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा बळी दिला. पोलिसांनी आरोपी तांत्रिक भोला उर्फ ​​हुकुम सिंग याला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याची शक्ती संपत चालली आहे. म्हणून ताकद बळकट करण्यासाठी चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने चिमुरड्याचा बळी दिला आहे. 

हे प्रकरण १५ जून रोजी जगनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी गावातील एका तांत्रिकाने रामअवतार याचा मुलगा ऋतिकचा बळी दिला. ओळख लपवण्यासाठी आरोपी तांत्रिकने मुलाचा मृतदेह गोणीत भरून किबार नदीत फेकून दिला. इकडे रामअवतार आपल्या मुलाला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकत होते. बराच वेळ शोधाशोध करूनही मुलगा न सापडल्याने त्याने पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला असता मुलाचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर गावातील एका व्यक्तीने पोलिसांना मदत केली. तांत्रिक हुकुमसोबत जाताना त्याने हृतिकला पाहिल्याचे त्याने सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हुकुम सिंग उर्फ ​​भोला याचा हृतिकचे वडील रामअवतार यांच्या जमिनीवर डोळा होता. हृतिकचे वडील रामअवतार यांना तांत्रिकाच्या वडिलांनी दत्तक घेतले होते. हुकुम सिंगला वाटले की, जर त्याने हृतिकला मारले तर रामअवतार गाव सोडून जाईल. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या वाट्याची जमीन मिळू शकते. हुकुम सिंगने एका दगडात दोन पक्षी मारण्याची योजना आखली होती. तंत्र-मंत्रावरही खूप विश्वास आहे. अशा प्रकारे देवीमाता देखील प्रसन्न होईल असे त्याला वाटले.आग्रा ग्रामीणचे एसपी सत्यजित गुप्ता सांगतात की, आरोपीला त्यांची तंत्र-मंत्र शक्ती काम करत नाही असे वाटत होते. जर त्याने मुलाचा बळी दिला तर त्याची शक्ती परत येईल. यासाठी त्याने मुलाला लक्ष्य केले. मुलगा विहिरीजवळ खेळत असताना आरोपीने त्याला आपल्यासोबत ट्यूबवेलमध्ये नेऊन त्याची हत्या केली. त्याला मारल्यानंतर त्याने मुलाचा मृतदेह देवीच्या समोर ठेवला आणि मंत्रोच्चार केला. यानंतर मुलाचा मृतदेह पोत्यात भरून किबार नदीत फेकून दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस