टँकर कंटेनरला धडकला, ड्रायव्हर अडकलेला असतानाच अमोनिया गॅसची गळती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:47 IST2022-01-12T14:47:30+5:302022-01-12T14:47:46+5:30
अपघातानंतर अमोनिया गॅस गळती सुरु झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

टँकर कंटेनरला धडकला, ड्रायव्हर अडकलेला असतानाच अमोनिया गॅसची गळती
पनवेलहून जेएनपीटीला जाणाऱ्या एनएच ४ बी महामार्गावर अमोनिया गॅसची वाहतूक करणारा टँकर कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अमोनिया गॅस गळती सुरु झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
एनएच ४ बी महामार्गावरील डी प़ॉईंटवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचा अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. या महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. अपघातानंतर कंटेनरचा चालक आतच अडकून पडला होता. त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.