कुटुंबियांच्या बोलवण्यावरून बॉयफ्रेन्ड गावी परत गेला, गर्लफ्रेन्डने कोचिंग सेंटरमध्येच केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 18:48 IST2022-04-02T18:47:35+5:302022-04-02T18:48:26+5:30

Crime News : प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, तरूणी कोचिंग सेंटरमधीलच एका तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांच्याही परिवारांना हे नातं मान्य नव्हतं.

Tamil Nadu : 18 yr old girl ended her life in a NEET coaching center in Coimbatore | कुटुंबियांच्या बोलवण्यावरून बॉयफ्रेन्ड गावी परत गेला, गर्लफ्रेन्डने कोचिंग सेंटरमध्येच केली आत्महत्या

कुटुंबियांच्या बोलवण्यावरून बॉयफ्रेन्ड गावी परत गेला, गर्लफ्रेन्डने कोचिंग सेंटरमध्येच केली आत्महत्या

Crime News : तामिळनाडूच्या कोयंबटूरमध्ये एका विद्यार्थीनीच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. १८ वर्षीय विद्यार्थीनी NEET कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती आणि तिथे हॉस्टेलमध्ये राहत होती. शनिवारी तरूणीचा मृतदेह कोचिंग सेंटरच्या एका रूममध्ये फॅनला लटकलेला आढळून आला. प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, तरूणी कोचिंग सेंटरमधीलच एका तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांच्याही परिवारांना हे नातं मान्य नव्हतं.

पोलिसांनी सांगितलं की, तरूणीच्या प्रियकराचे कुटुंबिय तिला मदुरई येथील आपल्या गावात परत येण्यास सांगत होते. यामुळेच तरूणी फार चिंतेत होती आणि यातच तिने आत्महत्या केली. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच चौकशीही सुरू केली आहे.

मध्य प्रदेशातही विद्यार्थीनीची आत्महत्या

मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थीनने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना धरम टेकडी चौकातील आहे. असं सांगितलं जात आहे की, विद्यार्थीनी दहाव्या वर्गात शिकत होती. पेपर चांगले गेले नसल्याने ती चिंतेत होती. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

बाडमेरमध्ये १०व्या विद्यार्थीनीची आत्महत्या

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातही एका तरूणाच्या फोन कॉल आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून १०व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. आरोपीनुसार, त्याने विद्यार्थीनीसोबत रेपचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यावरून तो तिला ब्लॅकमेल करत होता. विद्यार्थीनीने पाण्याच्या टाकीत उडी मारून केली आत्महत्या. तिने टाकीत उडी मारल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
 

Web Title: Tamil Nadu : 18 yr old girl ended her life in a NEET coaching center in Coimbatore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.