कोणाशी बोलत आहेस, तुझा फोन बघू म्हणत भांडणास सुरुवात आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:15 IST2019-04-12T18:07:39+5:302019-04-12T18:15:30+5:30
कोणासोबत फोनवर बोलत आहे असे विचारत बायकोवर सुरीने वापर करणाऱ्या नवऱ्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संबंधित महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कोणाशी बोलत आहेस, तुझा फोन बघू म्हणत भांडणास सुरुवात आणि...
पुणे : कोणासोबत फोनवर बोलत आहे असे विचारत बायकोवर सुरीने वार करणाऱ्या नवऱ्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संबंधित महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रायकर मळा, धायरी येथे राहणाऱ्या या जोडप्यामध्ये ही घटना घडली आहे. हे जोडपे राहत असलेल्या घरात घटना घडली असून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. ९ एप्रिल) रोजी रात्री ९च्या सुमारास महिला फोनवर बोलत असताना पतीने 'कोणाशी बोलत आहेस, तुझा फोन बघू म्हणत' भांडणास सुरुवात केली. यावेळी राग अनावर झाल्याने त्याने स्वयंपाकघरातील भाजी चिरायची सुरी घेऊन अचानक महिलेवर वार केले. यात महिलेच्या गळ्याला, डावे मनगट आणि उजव्या बरगडीला जखमा झाल्या असून उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे तपास करत आहेत.