शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा; एका दिवसात दहा लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 21:09 IST

पोलिसांची अचानक तपासणी मोहीम 

ठळक मुद्देमोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ४०७ बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध मोटार वाहन कायद्यान्वे कारवाई करून त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सातारा शहर वाहतूक शाखेकडून १ हजार २१२ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली

सातारा - वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने जिल्हा वाहतूक शाखा आणि सातारा शहर वाहतूक शाखेने अचानक तपासणी मोहीम राबवून एका दिवसात तब्बल दहा लाखांचा दंड वसूल केला.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत आणि सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी २१ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे नियोजन केले. महामार्ग तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ४०७ बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध मोटार वाहन कायद्यान्वे कारवाई करून त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.

सातारा शहर वाहतूक शाखेकडून १ हजार २१२ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण १० लाखांचा दंड एकाच दिवशी  वसूल करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढे सुद्धा अचानक अशा प्रकारची मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी केले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी