शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

महिलेशी अश्लील वर्तन करणारा स्विगीबॉय गजाआड; भररस्त्यावर काढली होती छेड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 9:35 PM

Molestation Case :  पोलिसांनी शिताफीने केली अटक

ठळक मुद्देसूरज सुधीर मालोदे (वय २७) असे त्याचे नाव असून तो स्विगी मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.

नागपूर : रस्त्याने जात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून भररस्त्यावर तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शिताफीने छडा लावला. सूरज सुधीर मालोदे (वय २७) असे त्याचे नाव असून तो स्विगी मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.

पीडित महिला २२ मे च्या दुपारी जरीपटक्यातून आपल्या घरी जात होती. आरोपीने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला. पीडित महिलेने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. भर दुपारी घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे पोलिसांनी आरोपीला हुडकून काढण्यासाठी परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी स्विग्गीची टी शर्ट घालून दिसला. तो धागा पकडून पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन फटांगरे, निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विजय धुमाळ, उपनिरीक्षक नवनाथ देवकाते, कोंडीबा केजगिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्विगीच्या बेंगलुरु मधील मुख्यालयात संपर्क साधून नागपुरात काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची माहिती मागवली. त्यातून २२ तारखेला दुपारी जरीपटका भागात कोणता कर्मचारी आला होता, त्याची माहिती काढली. त्याआधारे मालोदेच्या मुसक्या बांधल्या.आरोपी अभियंता! आरोपी हा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. दोन आठवड्यापूर्वीच स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून तो कामाला लागला होता. एकटी महिला पाहून त्याची नियत फिरली आणि त्याने हे कुकृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला हुडकून काढल्याबद्दल वरिष्ठांकडून तपास करणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :ArrestअटकnagpurनागपूरPoliceपोलिसMolestationविनयभंगSwiggyस्विगी