प्रियकराने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याने प्रेयसीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 02:09 IST2020-06-22T02:09:42+5:302020-06-22T02:09:49+5:30

कांदिवलीत एका २३ वर्षीय तरुणीने गळफास घेत शनिवारी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sweetheart commits suicide after boyfriend marries another girl | प्रियकराने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याने प्रेयसीची आत्महत्या

प्रियकराने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याने प्रेयसीची आत्महत्या

मुंबई : प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, आणि लग्नाची वेळ येताच दुस-या तरुणीसोबत लग्न केले. त्यामुळे कांदिवलीत एका २३ वर्षीय तरुणीने गळफास घेत शनिवारी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदिवली परिसरात राहणाºया तरुणीच्या ५३ वर्षीय वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. त्यांची मुलगी बारावीनंतर गेल्या ४ वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. बोरीवलीतील एका सेंटरमध्ये तिला प्रवेशही मिळाला होता. शनिवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास मुलगा मुलीला उठविण्याकरीता गेला, तेव्हा ती ओढणीच्यामदतीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या बेडवर सुसाईड नोट मिळून आली. या सुसाईड नोटमध्ये मुलीने हिृतीक मिश्रामुळे आत्महत्या केल्याचे नमूद केले.

Web Title: Sweetheart commits suicide after boyfriend marries another girl