जोधपूर - राजस्थानमध्ये साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केलेत. या घटनेबाबत स्थानिक लोक, भाविक आणि प्रशासन यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे परंतु आतापर्यंत साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचं गूढ उकललं नाही. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. परंतु नातेवाईक आणि साध्वी यांच्या समर्थकांकडून या मृत्यूवर शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी साध्वी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक बनवलं आहे.
याबाबत जोधपूर पोलीस आयुक्त ओम प्रकाश यांनी म्हटलं की, साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केली आहे. सर्व संभाव्य पैलूवर याचा तपास होत आहे. विसरा आणि पोस्टमोर्टम रिपोर्ट अजून पोलिसांकडे पोहचला नाही असं त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घटनेत कंपाऊंडर देवी सिंह राजपुरोहित यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारले जात आहेत. माहितीनुसार, देवी सिंह राजपुरोहितने साध्वी प्रेम बाईसाला एक नाही तर अनेक इंजेक्शन दिले होते. त्यानंतर साध्वी यांची प्रकृती बिघडू लागली.
काही पत्रकारांनी देवी सिंह जिथे काम करतो त्या सरकारी हॉस्पिटल मथुरादास माथुरचा दौरा केला. देवी सिंह राजपुरोहित हा सकाळच्या शिफ्टला यायचा परंतु त्याच्या मागील रेकॉर्ड्सबाबत कुणाला जास्त काही माहिती नाही असं तिथल्या स्टाफने सांगितले. जेव्हा साध्वी प्रेम बाईसाला तपासणीसाठी हॉस्पिटलला नेले जात होते. तेव्हा वाहनात त्यांच्यासोबत सुरेश नावाचा एक व्यक्ती होता. ज्याने त्यांना सीपीआर दिला. बुधवारी साध्वी प्रेम बाईसाचा मृत्यू झाला त्यानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला. साध्वी प्रेम बाईसा यांना त्यांचे वडील वीरमनाथ आणि सुरेश यांनी आश्रमातून जोधपूरच्या खासगी रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रत्यक्षदर्शीचा महत्त्वाचा खुलासा
खासगी रुग्णालयात साध्वी प्रेम बाईसा यांना मृत घोषित केल्यानंतर साध्वी यांचा मृतदेह वडिलांनी त्यांच्याच वाहनातून नेण्यावर जोर दिला. हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी होईल त्यामुळे साध्वी यांचा मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली. यातच आरती नगरच्या आश्रमात उपस्थित असलेल्या सुरेशला बोलवण्यात आले. जो अखेरच्या क्षणी साध्वी यांच्यासोबत होता. सुरेश यानेच साध्वी प्रेम बाईसा बेशुद्ध पडल्यावर त्याने त्यांना उचलले आणि वाहनात बसवले. साध्वी कारमध्ये एकच गोष्ट सातत्याने बोलत होत्या, पापा, मुझे न्याय दिला देना..साध्वी यांची नखे हिरवी पडली होती.
बाईसा रात्री अजमेरहून आल्या होत्या. सकाळी उठल्या तेव्हा त्यांचा गळा खराब झाला होता. बाईसा यांच्या वडिलांनी सुरेश यांना जेवण बनवण्यास सांगितले. संध्याकाळी ५ वाजता डॉक्टर बाईसा यांना पाहायला आले. ते साध्वी यांच्या खोलीत गेले तिथे इंजेक्शन दिले आणि २ मिनिटांनी पुन्हा परतले. डॉक्टर गेल्यानंतर ५ मिनिटांनी साध्वी बाईसा जोरदार किंचाळल्या, सुरेश धावत खोलीच्या दिशेने जात होता तितक्यात साध्वी मेन गेटपर्यंत येऊन खाली पडल्या. त्यांचे वडील वीरमनाथ हेदेखील धावले. मी तातडीने कार सुरू केली आणि आणि त्यांना आत बसवले. तिथे वडिलांकडे पाहून त्या मला न्याय द्या असं म्हणत होत्या असं प्रत्यक्षदर्शी सुरेशने सांगितले.
Web Summary : Rajasthan police investigate Sadhavi Prem Baisa's suspicious death. A witness reports she screamed, her nails turned green, and she pleaded for justice before dying. Compounding the mystery are multiple injections given by a compounder. An SIT is formed to investigate all angles.
Web Summary : राजस्थान पुलिस साध्वी प्रेम बाईसा की संदिग्ध मौत की जांच कर रही है। एक गवाह के अनुसार, उन्होंने चीखा, उनके नाखून हरे हो गए, और मरने से पहले उन्होंने न्याय की गुहार लगाई। रहस्य को बढ़ाते हुए एक कंपाउंडर द्वारा कई इंजेक्शन दिए गए। सभी कोणों से जांच के लिए एसआईटी का गठन किया गया है।