घरगुती वादातून नणंदेनेच हत्या केल्याचा संशय, पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड़
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:23 IST2021-01-31T20:22:38+5:302021-01-31T20:23:23+5:30
Murder : अंबरनाथच्या सिटी हॉस्पिटल परिसरात विवाहितेची हत्या

घरगुती वादातून नणंदेनेच हत्या केल्याचा संशय, पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड़
अंबरनाथ : एका २० वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. घरगुती वादातून नणंदेनंच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
अंबरनाथच्या सिटी हॉस्पिटल परिसरात असलेल्या जय भवानी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. जय भवानी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर सोनाली गिरी ही २० वर्षीय विवाहिता पती आणि सासरच्या मंडळींसह वास्तव्याला होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सोनालीचा मृतदेह घरात आढळून आला. सोनालीच्या डोक्यात आणि अंगावर काही मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. ही घटना घडली त्यावेळी तिची नणंद आणि सोनाली या केवळ दोघीच घरी असल्यानं पोलिसांनी थेट नणंदेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून सासऱ्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. घरगुती वादातून नणंदेनंच सोनालीची हत्या केल्याची प्राथमिक शक्यता यानंतर पोलिसांनी व्यक्त केलीये. या घतेनंतर पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम, क्राईम ब्रँच यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.